रेतीबंदर खाडीत सापडला व्यापाऱ्याचा मृतदेह

 ठाणे : ठाण्यात पुन्हा एकदा  कळवा येथील रेती बंदर खाडीत एका व्यापाराचा संशयास्पद मृतदेह  सापडला. मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत ज्या ठिकाणी सापडला होता, त्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर ठाण्यातील एका सराफाचा मृतदेह आढळला. त्यामुळे ठाणेकरांना पुन्हा एकदा मनसुख हिरण हत्या प्रकरणाची आठवण झाली.  भरत जैन असे या सराफाचे नाव असून सहा दिवसांपूर्वी त्यांच्या चरई येथील दगडी शाळेजवळ असलेल्या बी. के. ज्वेलर्समधून अज्ञात व्यक्तीने गाडीत बसवून नेले होते. त्यानंतर ते परत घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने पोलिसांकडे भरत हरवल्याची नोंद केली होती. त्यानंतर आज थेट त्यांचा मृतदेह आढळल्याने त्यांच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे.

ठाण्याच्या मखमली तलाव परिसरात भरत जैन राहत होते. 14 ऑगस्ट रोजी त्यांना अज्ञात व्यक्तीने कारमध्ये बसवून नेले. त्यानंतर ते पुन्हा घरी आलेच नाहीत. ह्या व्यक्तीसोबत जाताना त्यांनी आपल्या पत्नीला एका तासात परत येतो असे सांगितले होते. दुसऱ्या दिवशी ते परत न आल्याने पत्नीने पोलीस स्थानकात ते हरवल्याची नोंद केली होती. पोलिसांनी शोध घेतला असता एका टॅक्सी चालकाला चौकशीसाठी बोलावले होते. या टॅक्सीचालका सोबत आणि त्या अज्ञात व्यक्ती बरोबर भरत जैन तलाव पाळी परिसरात 8 तास फेऱ्या मारत होते. यापुढे नेमके काय झाले? भरत यांचा मृत्यू कसा झाला? याचा शोध आता नौपाडा पोलीस घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA