ठाणे: माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील इंदिरापाडा घोडबंदर रोड येथील तळ अधिक १ मजली लोडबेअरिंगचे अनधिकृत बांधकाम व नागलाबंदर घोडबंदर रोड येथील लोको मोको ढाब्याचे बांधकाम, आनंदनगर बस स्टॉप जवळ लोखंडी अँगलचे बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. तसेच कासारवडवली येथील स्टील्ट अधिक ५ मजली अनधिकृत इमारतीवरील मलदा साफ करण्याचे काम सुरू आहे.दरम्यान उथळसर प्रभाग समितीमधील नितीन कंपनी सर्व्हिस रोड, ठामपा मुख्यालय परिसर आणि खोपट येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून हातगाड्या जप्त करण्यात आल्या. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील कासारवडवली मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांवर कारवाई करून १ फूड टेम्पो व ८ हातागाड्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील वर्तकनगर नाका, रामचंद्र नगर आणि नितीन कंपनी सिग्नल जवळच्या फेरीवाल्यांवर कारवाई करून पदपथ व रस्ते मोकळे करण्यात आले.
ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज विविध ठिकाणांची अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे, शंकर पाटोळे, महेश आहेर आणि डॉ .अनुराधा बाबर यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.
0 टिप्पण्या