कळवा आणि दिवा प्रभाग समितीमधील बांधकामांवर कारवाई

 

  ठाणे महापालिकेच्यावतीने प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून आज कळवा आणि दिवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.   या कारवाईतंर्गत कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील टाकोली मोहल्ला येथील तळ अधिक ९ मजली अनधिकृत इमारतीच्या स्लॅबचे बांधकाम तोडण्यात आले तसेच घोलाईनगर येथील सोमजाई इमारतीच्या तळ अधिक ४ मजली इमारतीच्या ४ थ्या मजल्याच्या स्लॅबचे बांधकाम तोडण्यात आले. दिवा प्रभाग समिती पटेल कंपौंड येथील अनधिकृत गाळा निष्कासित करून आचार गल्ली म्हापे रोड येथील अनधिकृत फेन्सिंगचे चालू बांधकामही निष्कासीत करण्यात आले. दरम्यान नौपाडा- कोपरी प्रभाग समितीतंर्गत फेरीवाल्यांवर देखील कडक कारवाई करण्यात आली आहे.        सदर निष्कासनाची कारवाई  ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये  अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त अलका खैरे आणि यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या