किरीट सोमय्या यांच्या विरोधात १०० कोटींचा दावा दाखल

 प्रताप सरनाईक यांनी ठाणे कोर्टात दाखल केला विशेष दिवाणी दावा
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची बदनामी प्रकरणी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात  ठाणे कोर्टात १०० कोटींचा विशेष दिवाणी दावा सरनाईक यांनी दाखल केला आहे. रीतसर प्रक्रिया करून हा दावा नुकताच दाखल केला गेला असून सोमय्या यांना आता त्यांनी केलेल्या निराधार आरोपांबाबत कोर्टात उत्तर द्यावे लागणार आहे.

मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात पर्यावरणाचा ऱ्हास करून युवक प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा किरीट सोमय्या यांनी आपले पती भारतीय जनता पार्टीचे किरीट सोमय्या यांच्या राजकीय शक्तीचा वापर करून तब्बल १६ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम सीआरझेड व कांदळवन क्षेत्रात केले आहे. त्यात पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक करून खोटी कागदपत्रे सादर करून सर्व अनधिकृत शौचालयांची बिलेही वसूल केली आहेत.  याप्रकरणी सोमय्या पती-पत्नींवरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी, फेब्रुवारी महिन्यात केली होती. मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे ही मागणी केल्यानंतर सरकारने या प्रकरणाचा अहवालही मागवला होता. याप्रकरणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर महापालिकेकडून अहवाल मागवला होता व पालिकेने तो अहवाल शासनाला सादर केला होता. त्या अहवालात पर्यावरणाचा ऱ्हास करून शौचालयांचे  बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवले होते व पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. सोमय्या यांचा शौचालय घोटाळा बाहेर निघाल्याने सोमय्या यांनी आरोप करण्याची व बदनामीची मालिका सुरु केली असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला.

केंद्र व राज्य सरकारच्या संघर्षात महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे आमदार म्हणून केवळ राजकीय हेतूने, बदनाम करण्यासाठी हे आरोप करीत होते. जनतेत  संभ्रम निर्माण करण्यासाठी, प्रतिमा खराब करण्यासाठी ठरवून सर्व काही केले. यामुळे आपली प्रतिमा मलिन झाली असल्याचे सरनाईक म्हणाले, त्यामुळे आपण लवकरच सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सरनाईक यांनी जाहीर केले होते. तशी नोटीस सोमय्या यांना पाठवली होती व बदनामी केली म्हणून माफी मागा असे नोटिशीत सांगितले होते. मात्र नोटिशीला किरीट सोमय्या यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे अखेर त्यांच्यावर १०० कोटींचा दावा दाखल केला आहे. त्यासाठी कोर्टात जवळपास ३ लाख इतकी स्टॅम्पड्युटी भरली आहे. अशी माहीतीही सरनाईक यांनी दिली.

सोमय्या यांनी राजकीय द्वेषाची पातळी ओलांडून बदनामीचे घाणेरडे राजकारण केले आहे. बेलगाम खोटी विधाने करून त्यांनी अजेंडा म्हणून बदनामीची मोहीम सुरु केली. सोमय्या यांनी गेल्या ६ महिन्यात वेगवेगळ्या पत्रकार परिषदेत धादांत खोटी वक्तव्ये व बदनामी केली आहे. त्यांनी जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. खोटी विधाने आणि बातम्यांमुळे माझ्या प्रतिमेला जो तडा गेला , माझ्या इभ्रतीला जे नुकसान पोहोचले आहे , त्या नुकसान भरपाईपोटी मी विशेष दिवाणी दावा दाखल केलेला आहे व दिवाणी दाव्याचे मूल्य रक्कम १०० कोटी इतके आकारलेले आहे, असे सरनाईक यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.   https://www.prajasattakjanata.page/2020/12/blog-post_76.html

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1