Top Post Ad

दिवा व कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

; महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई  सुरुच असून आज दिवा आणि कळवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.  दिवा प्रभाग समितीमधील अली खान यांचे 60 × 90  मापाचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. तर कळवा प्रभाग समितीमधील खारेगाव येथील सुमारे 2000 चौरस फुटाचे 36 कॉलमचे बांधकाम तसेच तळ अधिक 6 मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम जेसीबी तसेच मजुरांच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.       सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अलका खैरे आणि प्रणाली घोंगे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.



अनधिकृत बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही
सविस्तर वाचा 👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com