Top Post Ad

हा तर महागाईच्या प्रश्नावरुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा डाव !- नाना पटोले

 मुंबई - मोदी सरकार लसीकरणात अपयशी ठरले आहे, चीनी सैन्याने घुसखोरी केली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सामान्य जनता महागाईने बेहाल झाली आहे  या महत्वाच्या प्रश्नावर मोदी सरकार चकार शब्द काढत नाही. काँग्रेस या मुद्द्यावरून मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवत असताना भाजपा जनतेचे लक्ष मुख्य प्रश्नावरून दुसरीकडे वळवत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाज विरोधी असून या समाजातील लोकांचा ते वापर करुन नंतर त्यांना बाजूला करते याचा वारंवार अनुभव आलेला आहे. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचाही भाजपाने वापर करुन नंतर त्यांना डावलले. खडसे यांना बदनाम केले गेले, झोटींग समितीचा अहवाल गहाळ झाला अशा बातम्या येत आहेत. खडसेंना बदनाम करण्यासाठीच घोटाळ्याचे षडयंत्र रचले गेले असू शकते असा संशय येतो. भाजपा हा बहुजन समाज विरोधी असून त्यांच्यामुळे ओबीसी व मराठा समाजाचे आरक्षणही कोर्टात रद्द झाले आहे.

मविआ सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पाडण्याचा भाजपा आटोकाट प्रयत्न करत आहे पण त्यात त्यांना यश आले नाही. याचाच एक भाग म्हणून मविआ सरकारच्या विरोधात सुरुवातीपासून बदनामीची मोहिम राबवली गेली. १०० कोटी रुपयांचे वसुलीप्रकरण त्यातीलच एक असून ज्यांनी आरोप केला त्या परमबीरसिंग व सचिन वाझे यांची चौकशी का केली जात नाही. अंटिलिया बंगल्यासमोर जिलेटीनच्या कांड्या कोणी ठेवल्या, हा मुख्य मुद्दा असताना त्याचा तपास केला जात नाही, हे सर्व स्क्रिप्टेड असून त्याप्रमाणेच होत आहे, असे पटोले म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे सोमवारी मुंबईत होते. पत्रकार परिषदेत खरगे यांना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत विचारले असता, मी पटोले यांच्यावर काहीही बोलणार नाही, असे म्हणत खरगे यांनी बोलण्यास नकार दिला.  मात्र नाना पटोले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यात काँग्रेस जिवंत असल्याचे जाणवते आहे. पटोले यांच्या रूपाने काँग्रेसला राज्यात लढाऊ नेतृत्व लाभले आहे, असे राहुल गांधी यांना वाटते आहे. त्यामुळे पटोले यांना थोडीशी आवर घालतानाच त्यांना त्यांच्या पद्धतीने पक्ष संघटनेचे काम करू द्यावे, अशी सूचना मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्य प्रभारी एच. के. पाटील यांना केल्याचे सूत्रांनी सांगितले. शरद पवार सारखे मोठी नेते नानाभाऊ यांना छोटा माणूस मानतात ,त्यांच्या बोलण्याकडे फारस लक्ष देत नाही अस म्हणतात हिच नानाभाऊच्या कार्य कुशलतेची पोच पावती आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com