Top Post Ad

वडिलांच्या पुण्यानुमोदनानिमित्त सांस्कृतिक भवनास पन्नास हजार रुपये दान

दान पारमीतेचे पालन

    शहापूर  : सामाजिक भान राखत समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीचे तंतोतंत पालन करत एका सेवा निवृत्त मुलाने केले त्याच्या माजी मुख्याध्यापक दिवंगत वडिलांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे औचित्य साधून दान पारमितेचे पालन करत सामाजिक व धार्मिक कार्यास  साडे सत्तावन्न हजार रुपयांचे दान केले आहे. शहापूर तालुक्यातील शिरोळ गाव म्हणजे ठाणे जिल्ह्यातील पूर्वीचे शिक्षणाचे माहेर घर, या गावाने त्या काळी ठाणे जिल्ह्याला अनेक शिक्षक दिले. शिरोळ गावचे त्याकाळचे शिक्षक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिवंगत भालचंद्र कृष्णाजी पवार यांचे नुकतेच वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. 

  त्यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे औचित्य साधून शहापूर येथील शेट्ये मॅरेज हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात  त्यांचे सेवानिवृत्त पुत्र प्रकाश भालचंद्र पवार यांनी आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने सामाजिक बांधिलकी जपत शहापूर येथे धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेच्या माध्यमातून निर्माण होत असलेल्या भव्य सांस्कृतिक भवनास पन्नास हजार रुपये, भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका, शाखा वाडा तालुका तसेच शाखा शिरोळ यांना प्रत्येकी अडीज हजार रुपयांचा धनादेश देत एकूण साडे सत्तावन्न हजारांचे दान करून दान पारमितेचे पालन केले आहे.  बौद्ध धम्माचे पालन व प्रचार-प्रसार करणाऱ्या या संपूर्ण पवार कुटुंबाने दान पारमितेचे यथाशक्ती पालन करून आपली सामाजिक व धार्मिक जबाबदारी पार पाडली. खरं तर बुद्ध विचारांनुसार आपल्या प्रत्येक कृत्यातून आणि कार्यातून समाजाला नैतिक फायदा व्हायला हवा, हीच भावना बाळगून संपूर्ण पवार परिवाराने केलेला हा वैचारिक कार्यक्रम  खऱ्या अर्थाने समाजासाठी एक उत्तम उदाहरण म्हणून उदयास आलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com