"शाहू छत्रपतींनी आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभले याबद्दल त्यांचे अभिनंदन त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा." -१९ व २० मार्च रोजी माणगाव परिषद मध्ये मंजूर करण्यात आलेला खास ठराव. या ठरावाला अनुसरून सालाबाद प्रमाणे याहीवर्षी दिनांक २६ जून २०२१ रोजी आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. या जयंती सोहळ्याप्रित्यर्थ तसेच हे वर्ष (६ मे २०२१ ते ६ मे २०२२) शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त बुद्धभूमी फाऊंडेशन, कल्याण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृति प्रेरणा केंद्र, सातारा यांचे सयुक्त विद्यमाने छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रीडांगण आणि अहिल्याबाई होळकर फळ-वृक्षवन उदघाटन सोहळा शनिवार दि.२६ जून २०२१ रोजी बुद्धभूमी फाऊंडेशन, अशोकनगर वालधुनी, कल्याण. सायं: ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बुद्धभूमी फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष भदंत गौतमरत्न थेरो आणि कार्यक्रमाचे मुख्य संयोजक- प्रोफेसर आयु. सुहास चव्हाण यांनी केले आहे.
या वर्षात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 'शरीर संपत्ती' या महत्वपूर्ण विचारांचे मर्म जाणून "पहिले शरीरसंपत्ती, दुसरी पुत्र संपत्ती, व तिसरी धनसंपत्ती असेल तोच खरा पुण्यवान " मोतीबागेतील तालीमखानाच्या प्रवेशद्वारा वरील फलकामधून प्रकट झालेले छत्रपती शाहू महाराजांचे विचार. या विचारांना अनुसरून मैदानी खेळाद्वारे 'शरीर संपत्ती' कमावण्यासाठी, ति जोपासण्यासाठी युवा पिढीला प्रेरित करण्यासाठी आपण एक "छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रीडांगण" निर्माण केले आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व सरकारी खर्चात गरीब माणसांच्या दारात 12 फळझाडे लावली त्यातील 7 झाडे गरीबाची व 5 झाडे सरकारची, निगा राखून शेतकऱ्यांनी फळे सातबारा (7/12 ) स्वतः खाण्याची व 5/12 फळे सरकारी जमा करावयाची, गरिबांना वाटण्यासाठी. हि योजना तयार केली. या योजनेसाठी सरकारी दप्तर निर्माण करून या झाडांची नोंद करण्यात आली या नोंदी उताऱ्याला सातबारा (7/12)चा उतारा म्हणण्याचा प्रघात पडला.(यावरूनच आजही शेत जमिनीची 7/12 अशीच नोंद होते.) अहिल्याबाई होळकरांनी जनसहभागामधून वृक्षबागांच्या निर्मिती साठी व संवर्धनासाठी महत्वपूर्ण सुरूवात केली. निसर्गाचें जतन व संवर्धन केले. इतकेच नव्हे तर गरीब शेतकऱ्यांना स्वतःची तसेच गोरगरिबांना फळे मोफत मिळावीत म्हणून अहिल्याबाई होळकर यांनी सुरू केलेल्या या मानवतावादी प्रयोगाने प्रेरित होऊन आम्ही फळझाड यांनी युक्त अशी "पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर वृक्षवाटिका" निर्माण केली आहे. या वर्षी 300/500 पिंपळ व इतर फळझाडे लावण्याचे संकल्प असून त्यापैकी जमा झालेले रोपांचे वृक्षारोपण यावेळी करण्यात येणार आहे.
बुद्धभूमी फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष भदंत गौतमरत्न थेरो यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या उदघाटन व वृक्षारोपण समारंभास उपस्थित राहून आपल्या हातून वृक्षारोपण करण्यासाठी बुद्धभूमी फाउंडेशनचे सर्व आश्रयदाते सभासद, आजीव सभासद व रोप दानदाते यांना याद्वारे आग्रहाचे निमंत्रण करण्यात येत असल्याची माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक- प्रोफेसर आयु. सुहास चव्हाण मो. 9987429394. आणि निमंत्रक- आयु. गणेश मोरे, आयु. सुशील कुमार, आयु. सुरेश कटारे, आयु. राज बहादुर यादव, अायु. अतिफ शेख, अनिल कलंके, आयु. उल्हास सपकाळे, आयु. दिपेश देवरे.यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या