बहुजन समाज पार्टी वासिंद शहराच्या वतीने राजर्षी शाहु महाराज यांची जयंती साजरी

   शहापूर -  बहुजन समाज पार्टी वासिंद शहर यांचे विद्यमाने रविवारी दुपारी दीड वाजता न्यू आयडीयल स्कुल जुनी इमारत वासिंद येथे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती वासिंद शहर अध्यक्ष आनंद गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी बहुजन समाज पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष भालेराव, भिवंडी लोकसभा माजी अध्यक्ष राजेश निकम, शहापूर विधानसभा अध्यक्ष गुरुनाथ लोखंडे,  उपाध्यक्ष  प्रदीप गायकर, प्रकाश श्यामकुवर,  महासचिव ऍड महेंद्र जाधव, बामसेफ प्रमुख महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. 

   या प्रसंगी वासिंद सेक्टर व वासिंद शहरच्या कार्यकारिणिची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले तसेच जयंती निमित्त वंजारी समाजाचे रवींद्र सज्जन पवार,  व धनगर समाजाचे निवृत्त करनिर तुकाराम पवार या कार्यकर्त्यांनी बहुजन समाज पक्षात जाहीर प्रवेश केला. तर नवनिर्वाचित शहापूर विधानसभा कमिटीस ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष भालेराव, भिवंडी लोकसभा माजी अध्यक्ष राजेश निकम यांचे हस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आली. तसेच उपस्थितांना भारताचे संविधान उद्देशिका, मानवता दिनदर्शिका आणि आंबेडकरी चळवळ जिवंत आहे हे पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे जिल्हा सचिव सिद्धार्थ साळवे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वासिंद शहर कमिटीने विषेश महिनात घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या