जखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश


 शहापूर : तालुक्यातील खर्डी वनविभागाच्या हद्दीतील  मौजे पळशीन गावा जवळील रस्त्यावरील मोरीच्या गोलाकार सिमेंटच्या पाईपात लपून बसलेल्या तरस जातीच्या वन्यप्राण्याला वनविभागाने पिंजऱ्यात पकडून पुढील वैद्यकीय उपचारांकरिता संजय गांधी नॅशनल पार्क येथे पाठविला असल्याची माहिती खर्डी   वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी दिली. सोमवारी खर्डी ते वैतरणा जवळील पळशीन गावच्या  रस्त्यावरील पाईपात जखमी अवस्थेत हुबेहूब बिबट्या सारखा दिसणारा तरस जातीचा वन्यजीव लपल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनअधिकाऱ्यांनी लोखंडी पिंजऱ्याचा सापळा लावून त्याला पकडले. त्याच्या पायाला जखम झाली असल्याने त्याच्यावर उपचार होण्याची गरज लक्षात घेऊन उपचार व देखभाल करणाऱ्या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे.  


सदर प्रसंगी खर्डी  प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एस. देशमुख, वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी डी. व्ही. ठाकूर, वनरक्षक जी. एस. भांगरे, जी. एस. भोये, व्हाय. पी. पाटील, पी. डी. बेलदार, डी. डी. ठोंबरे, एस. एल. शिंदे, पी. एल नागरगोजे, एम. एन. आढाव, व्ही. एस. लखडे,एन. एस. श्रावणे, वनपाल काष्टी, आदी वनपरिक्षेत्र खर्डी प्रादेशिक आणि वन्यजीव चे कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन जखमी तरस वन्य प्राणी रेस्क्यू करून पकडून पुढील वैद्यकीय उपचारांकरिता संजय गांधी नॅशनल पार्क येथे पाठविले आहे.  खर्डी गावाशेजारीच तानसा अभयारण्याचे क्षेत्र असल्याने हे तरस भटकत रस्त्यावर आले असावे असा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी  व्यक्त केला आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA