Top Post Ad

राममंदीर जमिन घोटाळा, दहा मिनिटात जमिनीच्या भावात सुमारे १६ कोटीची वाढ

  अयोध्या:  राममंदीराच्या निर्मितीसाठी घरोघरी जाऊन वर्गणी जमा करण्यात आली. मात्र या सर्व पैशाचा अपहार होत असल्याचा आरोप आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टीने केला आहे.  संपूर्ण बामण समाजाचे वर्चस्व असलेल्या राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप या ट्रस्टवर करण्यात आला आहे. जो भूखंड 2 कोटींचा आहे. तो अवघ्या दहा मिनिटात 18 कोटींचा करण्याची किमया या राममंदीराच्या नावाने निर्माण झालेल्या ट्रस्टने साधल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण देशातील रामभक्तांना धक्का बसला आहे.  केवळ दहा मिनिटात ट्रस्टने भूखंडाची किंमत कोट्यवधी कशी केली तसेच ट्रस्टने एवढ्या महागड्या भावात भूखंड का खरेदी केला? कशासाठी केला? हा व्यवहार कधी झाला आणि त्याला मंजुरी मिळाली तरी कशी? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. राम मंदिरासाठीच्या भूखंडाचा हा घोटाळा बाहेर आल्याने या ट्रस्टच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. 

आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया आणि पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी कागदपत्रांच्या हवाल्याने हा आरोप केला आहे. सिंह यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी आम आदमी पक्षासह  माजी मंत्री, समाजवादी पक्षाचे पवन पांडेय यांनीही केली आहे.  कॉंग्रेसनेही राम मंदिर ट्रस्टला फटकारले असून भगवान राम यांच्या नावाने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

पाच मिनिटांत जमीन किंमत दोन कोटी डॉलरवरून १₹..5 कोटीपर्यंत वाढू शकते, असा प्रश्न आपचे नेते मनिष सिसोदिया यांनी केला आहे.  मंदीराच्या नावाखाली काही मिनिटांतच भाजपने हिंदुत्वाचे ११५ कोटी अनुयायी बनवले, श्रीरामजन्मभूमी ट्रस्टने १ मार्च रोजी १८,5 कोटी किमतीची १२,०8० चौरस मीटर जमीन खरेदी केली. या ट्रस्टचे सदस्य असलेले अनिल मिश्रा आणि भाजपाचे महापौर रुषिकेश उपाध्याय यांच्या उपस्थितीत रवि मोहन तिवारी आणि सुलतान अन्सारी यांच्याकडून ही जमीन खरेदी केली गेली.  पण रवी मोहन तिवारी आणि सुलतान अन्सारी यांनी हरीश पाठक आणि कुसुम पाठक यांच्याकडून ती जमीन पाच मिनिटांपूर्वी दोन कोटी मध्ये खरेदी केली होती. पाच मिनिटांत रवि मोहन तिवारी आणि सुलतान अन्सारी यांनी आश्चर्यचकितपणे ते ट्रस्टला 18.5 कोटी मध्ये विकली. या दोन्ही व्यवहारात अनिल मिश्रा आणि अयोध्याचे भाजपचे नगराध्यक्ष रुषिकेश उपाध्याय हे साक्षीदार होते अनेक रामभक्तांनी या मंदिर उभारणीकरिता पैशाची देणगी दिली. त्या पैशावर भाजप आपला स्वार्थ साधत असल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला,

खासदार संजय सिंह म्हणतात की, भगवान श्रीराम यांच्या नावाने कोणी घोटाळा करू ठाकेल याची कल्पनाही करू शकत नाही, पण माझ्या हाती पुराव्याची सबळ कागदपत्रे आहेत. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने जमीन व्यवहारात कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केला आहे. दहा मिनिटांपूर्वी दोन कोटींना विकत  घेतलेल्या जमिनीचा भाव प्रत्येक सेकंदाला साडेपाच लाखाने वाढत गेला. भारतात काय, तर जगात  कुठल्याच जमिनीचा भाव इतक्या वेगाने वाढत नाही. हा प्रश्न देशातील कोटय़वधी रामभक्तांसह राममंदिराच्या निर्माणासाठी आपल्या कष्टाने कमावलेले पैसे मंदिरासाठी देणाऱ्यांच्या विश्वासाचाही आहे.'   भाजपा नेत्यांनी “घोटाळ्या” मध्ये सामील असलेल्या सर्वांचा बचाव केला आहे. “भाजप नेत्यांनी आता या घोटाळ्याच्या माध्यमातून किती कमाई केली हे आता समोर आले पाहिजे आणि जाहीर करावे की, भाजप नेते आणि अयोध्याच्या महापौरांची यामध्ये किती मोठी भूमिका आहे. श्रीरामजन्मभूमी ट्रस्टने लोकांच्या देणग्याद्वारे मिळणाऱ्या पैशांचा संपूर्ण हिशोब द्यावा, अशी मागणी सिंह यांनी केली आहे.

दरम्यान, ट्रस्टने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ट्रस्टचे महासचिव आणि विहिंपचे नेते चंपत राय आंनी अधिकृत पत्र जारी करून हे आरोप फेटाळून लावले आहेत. वास्तूनुसार मंदिर परिसराच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला परिसराच्या सुरक्षेसाठी काही छोटेमोठे मंदिर आणि निवासस्थाने बनविण्याची गरज होती. ज्यांच्याकडून घरे खरेदी केली जाणार आहेत. त्यांना पुनर्वसनासाठी जमीन दिली जाणार आहे. त्यासाठी भूखंड खरेदी केला जात आहे. आम्ही खरेदी केलेला भूखंड बाजार भावानेच खरेदी केला आहे. मात्र राजकीय लोक द्वेषाने प्रेरित होऊन संभ्रम निर्माण करत आहेत, असं चंपत राय यांनी म्हटलं आहे.




👇👇 वाचा
बहुजन मारामाऱ्या करायला आणि माल (ट्रस्ट) मात्र बामण उडवतात - उदीत राज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com