Top Post Ad

बहुजन मारामाऱ्या करायला आणि माल (ट्रस्ट) मात्र बामण उडवतात - उदीत राज

लखनऊ:
काँग्रेस नेते उदित राज यांनी आपल्या अधिकृत ट्विट हँडलवरून  ट्विट केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, 'भारतात झालेल्या मागच्या जनगणेनुसार, दलितांची लोकसंख्या बामणांपेक्षा तिपटीने अधिक आहे. मग शासकीय राम मंदिर ट्रस्ट केवळ बामणाच्या भरोश्यावर कशी काय सोडली जाऊ शकते. सरकार बेईमानी करत आहे. बहुजनांना मारामाऱ्या करायला सांगते आणि माल (ट्रस्ट) मात्र बामण उडवतात.' राम मंदिराच्या ट्रस्टवर एससी, एसटी, ओबीसी आणि महिलांनादेखील स्थान मिळायला हवे, अशी मागणीही डॉ. उदित राज यांनी केली आहे. 
त्याचप्रमाणे  रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल यांनी मंदिर आंदोलनास चालना देणाऱ्या धर्माचार्यांची ट्रस्टमध्ये उपेक्षा केली जात असल्याच्या भावनेतून ट्रस्टला विरोध दर्शवला. ते म्हणाले, आहुती देणाऱ्याचेच विस्मरण झाले. कमलनयन दास यांनी हा ट्रस्ट आपल्याला मान्य नसल्याचे म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून केंद्र सरकारने स्थापन केलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये स्थान न मिळाल्याने गुरुवारी संत-महंतांनी तीव्र नापसंती दर्शवली.  गृहमंत्री अमित शहा यांनी मणिराम दास छावणीचे महंत व नृत्य गोपालदासचे उत्तराधिकारी कमलनयन दास यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. 
 माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते डॉ. उदित राज यांनी केलेल्या या ट्विटमुळे पक्षात खळबळ माजली आहे. या ट्विटवरून काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांनी डॉ. उदित राज यांच्या मुद्द्याला आव्हान दिले आहे. तर, दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी देखील उदित राज यांना सुनावले आहे. डॉ. उदित राज यांनी राम मंदिर ट्रस्ट आणि दलित याबाबत ट्विट केले आहे. यात ब्राह्मणांकडून 'माल उडवण्या'बाबत वक्तव्य केले आहे.

त्याचप्रमाणे साध्वी उमा भारती यांनीही या ट्रस्टबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दलित समाजातील एक व्यक्ती घेतला त्याप्रमाणे ओबीसी समाजातीलही व्यक्तींचा या ट्रस्टमध्ये समावेश करायला हवा होता. राममंदीर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ओबीसी समाजाला डावलले जाणे हे चुकीचे असल्याचे मत भारती यांनी व्यक्त केले.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य

के. परासरन (रामललाचे वकील)
जगतगुरु शंकराचार्य ज्योतिषपीठाधीश्वर स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज (प्रयागराज)
जगतगुरु माधवाचार्य स्वामी विश्व प्रसन्नतीर्थ महाराज (पेजावर मठ, उडुपी)
युगपुरुष परमानंद महाराज (हरिद्वार)
स्वामी गोविंददेव गिरी महाराज (पुणे) - पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या तत्वज्ञान विद्यापीठ (ठाणे) चे विद्यार्थी
महंत दिनेंद्र दास (निर्मोही अखाडा, अयोध्या)
विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र (अयोध्या)
अनिल मिश्र (होमियोपेथी डॉक्टर, अयोध्या)
कामेश्वर चौपाल (अनुसूचित जातीचे सदस्य, पटना)

या ट्रस्ट बोर्डचे सदस्य बहुमताने 2 प्रमुख सदस्यांची निवड करतील. केंद्र सरकारमधून ही एक प्रतिनिधी या बोर्डमध्ये सहभागी असेल. जो आयएएस अधिकारी असेल आणि त्यांचा दर्जा जॉईंट सेक्रेटरी पेक्षा कमी नसेल. केंद्राचे हे प्रतिनिधी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य असतील. राम मंदिर परिसरात विकास आणि प्रशासनाशी संबंधित प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी कमेटीच्या चेअरमनची नियुक्ती ट्रस्ट करेल.

ट्रस्टमध्ये उत्तर प्रदेश सरकारचे 2 प्रतिनिधी ही असतील. राज्य सरकारचे सचिव जे आयएएस अधिकारी असतील आणि दुसरे अयोध्येचे जिलाधिकारी असतील. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारचे हे सदस्य हिंदू धर्माला मानणारे असतील अशी अट ठेवण्यात आली आहे. जर अयोध्येचे जिलाधिकारी हिंदू नसतील तर इतर अॅडिशनल कलेक्टर याचे सदस्य असतील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com