भूमिपूत्रांचा दुश्मन

 महाराष्ट्र राज्याचे नगरविकासमंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे हे नेहमीच भूमिपुत्रांचे विरोधक राहिले आहे. याचे अनेक दाखले, पुरावे आहेत. स्थानिक भूमिपुत्र आगरी-कोळ्यांची ढाल करुन आपापसात लढवून आपली पोळी भाजून घेतली आहे.  आपला मुलगा डाॅ.श्रीकांत शिंदे याला खासदार बनविण्यासाठी आगरी खासदार कपिल पाटील यांचे खास आगरी बंधू दोस्त डोंबिवलीच्या बाबाजी पाटील यांना निवडणुकीला उभे करुन आगरी-कोळी मतांचे विभाजन करुन आपल्या मुलाला निवडून आणले. खासदार कपिल पाटील यांच्याशी एकनाथ शिंदेंचा Agreement आहे. भिवंडी लोकसभा तुला आणि कल्याण लोकसभा माझ्या मुलाला. 

परप्रांतीय संतोष शेट्टीला खासदार कपिल पाटीलच्या मदतीने आगरी आमदार रुपेश म्हात्रे यांच्यासमोर काँग्रेसचे तिकीट देऊन रुपेश म्हात्रेंना पाडले. राजकारणात दबदबा निर्माण करणारे आणि लोकांच्या मदतीला धाऊन जाणारे आपले आगरी बाळ्यामामा यांना जाणीवपूर्वक डावलून पक्षाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. आपलेच आगरी बंधू शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि तालुका प्रमुख विश्वास थळे यांना हाताशी धरुन बाळ्यामामांना डावलले. आणि आता आपले आगरी बंधु जिल्हापरिषदेचे आरोग्य सभापती चांगले काम करतात, लोकांची काळजी करुन नाव कमवत असल्यामुळे आता त्यांनाही डावलले जाणार आहे. 

शहापुरच्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेला धडा शिकवला. पक्ष बदलून आलेल्या पांडुरंग बरोराला तिकिट देऊन दौलत दरोडा या शिवसैनिकाला डावलल्यामुळे शहापूरच्या शिवसैनिकांनी त्यांच्या उमेदवाराला पाडले. आणि दौलत दरोडा यांना निवडून आणले. अशी हिंमत ठाणे जिल्ह्यात कोणत्याच शिवसैनिकांनी दाखवली नाहीं. ती दाखविण्याची खरी गरज आहे. ठाण्यात वरचढ चढत असलेल्या कोळी समाजाचे दिवंगत अनंत तरेंना नेहमीच त्रास दिला. 

क्लस्टर योजना आणून स्थानिकांना विस्थापित करण्यासाठी याच एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेतला. आगरी-कोळी यांना नेहमीच पाण्यात बघून या भूमिपुत्रांना आपापसात लढवून या शिंदेनी आपली पोळी भाजुन घेतली आहे. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची वाट लावण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. उध्दव ठाकरेंना आमदार घेऊन बाहेर पडण्याची धमकी कुणी दिली हे आता सर्वांनाच कळलेय.  बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर शिवसैनीक आमदारांनी उध्दव ठाकरेंकडे जाऊन आम्ही त्यांच्याबरोबर नाही आहोत हे सांगायला पाहिजे. तरच याला धडा मिळेल. नाहीतर हा असाच भुमिपुत्र दि.बा.पाटील सारख्या लोकनेत्याला विरोध करुन भुमिपुत्रांवर अन्याय करून आपणच इथले किंग आहोत हे दाखवून देईल. 

म्हणून माझ्या तमाम भुमिपुत्रांना नम्र विनंती करतो की, याला राजकारणातुनच हद्दपार करा. याला जिल्हा बंदी करा. नाहीतर हा भिवंडीत रिंगरोड आणून भादवड, टेमघर, कामतघर येथील भूमिपुत्रांची घरे आणि जमिनी कवडीमोल भावात विकायला लावून या भूमिपुत्रांवर भूमहीन आणि विस्थापित करण्याची वेळ आणेल! 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA