Trending

6/recent/ticker-posts

कोविड कालावधीत डॉक्टर्स करीत असलेल्या कार्याला सलाम ! - मंत्री राजेश टोपे

         कोविड कालावधीत सर्व डॉक्टर्सनी केलेल्या कार्याला माझा सलाम ,या pandemic मध्ये चांगले निर्णय घेण्यासाठी डॉक्टरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे असे उद्गार राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काढले, राज्यात कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरू शकते अशी शक्यता वर्तविली जात असल्यामुळे काल रात्री IMA  कल्याण व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने paediatric covid या विषयावर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या वेबिनार मध्ये ते बोलत होते.   

सदर वेबिनार मध्ये देशभरातील सुमारे 700 डॉक्टर्स/ बालरोगतज्ञ सहभागी झाले होते.  वेबिनार यशस्वी करण्यासाठी IMA कल्याण चे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील यांचेसह डॉ इशा पानसरे, डॉ आनंद लीटकर , डॉ गिरीश भिरुड,डॉ सोनाली पाटील, डॉ राजेश राघवराजू डॉ राजेश्‍वर वानखेडे डॉआशिष पाटील इत्यादींनी परिश्रम घेतले.

राजेश टोपे  पुढे म्हणाले,  या वेबिनार मधील ज्ञान देशात सगळ्यांना उपयोगी पडू दे , त्याच प्रमाणे वेबिनारमधील उपयुक्त टिप्स शासनाकडेही पाठवा. सध्या पोस्ट- कोविड रुग्णांत दिसून येणाऱ्या म्युकरमायकॉसिस या आजारासाठी लागणारे amphotericin हे औषध येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होईल.

या वेबिनार मध्ये डॉक्टर राहुल यादव- नवजात तज्ञ ,कांची कामकोटी, चाइल्ड ट्रस्ट हॉस्पिटल, डॉक्टर तनु सिंघल- बालरोग संसर्गजन्य रोग तज्ञ, कोकिलाबेन हॉस्पिटल मुंबई तसेच डॉक्टर परमानंद आंदणकर- बालरोगतज्ञ सल्लागार, ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे या तज्ञ डॉक्टरांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत मुलांना संभवणारा धोका लक्षात घेऊन मुलांमध्ये दिसून येणारी कोविडची लक्षणे ,त्यावर करावयाच्या उपाय योजना ,कोविडग्रस्त गरोदर माता, त्यांचे लसीकरण या विषयांबाबत उपस्थित डॉक्टरांना मोलाचे मार्गदर्शन केले.

मुलांना कोविडच्या संभाव्य लाटेचा सामना करावा लागू नये यासाठी या वेबीनारचे आयोजन केले असल्याची माहिती IMA कल्याण चे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील यांनी यावेळी दिली. कल्याण-डोंबिवलीतील सर्व वैद्यकीय संघटनांनी कोविड कालावधीत महापालिकेत फार मोलाची मदत केल्याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीतील सर्व वैद्यकीय संघटनांचे आभार मानले. 


Post a Comment

0 Comments