रोज 100 नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा

 18 ते 44 वयोगटामधील लसीकरणाच्या सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 2 ते 5 या दोन्हीही सत्रांसाठी रोज सायंकाळी 5 वाजता नोंदणीकरण 
तर 45 वरील वयोगटासाठी ॲानलाईन आणि ॲाफलाईन या दोन्ही पद्धतीने लसीकरण करण्यात येणार 

 ठाणे  लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांची कोणतेही गैरसोय होवू नये यासाठी ठाण्यात विविनाना मॉलच्या पार्किंगमध्ये 'ड्राइव्ह इन' लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या ६० वर्षांवरील नागरिकांनाया सुविधेचा लाभ घेता येणार आहे. येत्या दोन दिवसात हे केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असून या केंद्रावर रोज नोंदणी केलेल्या केवळ 100 ज्येष्ठ नागरिकांनाच सकाळी 10 ते 1 या वेळेत लस देण्यात येणार आहे.      शहरात लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरातील जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राइव्ह इन' सुविधा सुरू करण्याच्या सूचना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. या संदर्भात महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतखाली काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सर्व पदाधिकारी, महापालिका आयुक्त आणि सर्वपक्षीय गटनेते यांच्या बैठकीतही चर्चा झाली होती.  

या लसीकरण केंद्रामध्ये गाड्यांना येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार असून आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेडस लावण्यात येणार आहेत. त्यामुळे बाहेर कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात  येणार आहे. तसेच लसीकरणानंतर निरीक्षणासाठीही पार्किंगमध्येच व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.   लसीकरण केंद्रांवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुविधा, अर्ध्या तासाच्या विश्रांतीसाठी व्यवस्था आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था केली जाणार आहे. ही सुविधा ६० वर्षांवरील नागरिकांसाठीच असून लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी, तसेच लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे.

दरम्यान लसीकरणामध्ये अधिक सुसुत्रता आणण्यासाठी महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून 18 ते 44 या वयोगटातील लसीकरण हे पूर्णतः ॲानलाईन नोंदणीद्वारे होणार असून त्यासाठी आता रोज सायंकाळी 5 वाजता नोंदणीकरण आणि बुकिंग करता येणार आहे तर 45 वरील वयोगटासाठी ॲानलाईन आणि ॲाफलाईन पद्धतीने लसीकरण करण्यात येणार असून यापुढे टोकन पद्धत राहणार नसल्याची माहिती महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिली.  काही दिवसांपूर्वी महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतखाली पार पडलेल्या सर्व पदाधिकारी, महापालिका आयुक्त आणि सर्वपक्षीय गटनेते यांच्या बैठकीतही लसीकरणामध्ये सुसुत्रता आणण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतरही लसीकरणाबाबत काही तक्रारी महापौर तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.

        यातंर्गत 18 ते 44 वयोगटामधील लसीकरणाच्या सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 2 ते 5 या दोन्हीही सत्रांसाठी रोज सायंकाळी 5 वाजता नोंदणीकरण करता येणार आहे. तर 45 वरील वयोगटासाठी ॲानलाईन आणि ॲाफलाईन या दोन्ही पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे. ॲानलाईनसाठी 7 केंद्रे निश्चित करण्यात येणार असून उर्वरित 37 केंद्रावर ॲाफलाईन पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे. या सर्व केंद्रांची यादी रोज महापालिकेच्यावतीने प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  45वरील वयोगटासाठी रोज सायंकाळी 5.30 वाजता ॲानलाईन नोंदणीकरण करता येणार आहे. तसेच ॲाफलाईन पद्धतीने ज्या केंद्रांवर लसीकरण होणार आहे त्या ठिकाणची टोकन पद्धत बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी सर्व वैद्यकिय अधिकाऱ्यांना दिले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA