Top Post Ad

को-रो-नाच्या उपचारासाठी रुग्णालयात भरती व्हावे लागले, तर या गोष्टींची नोंद घ्या


 को-रो-नाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. यावेळी संसर्ग जास्त वेगाने आणि सहजतेने होतोय असे तज्ञ मंडळी सांगत आहेत. म्हणून आपण सगळ्यांनी जास्तीतजास्त काळजी घेणे आवश्यक आहे, जी तुम्ही घेत असालच. तरीही आपल्या संपर्कात असलेले कुणालाही उपचारासाठी रुग्णालयात भरती व्हावे लागले, तर खालील गोष्टींची नोंद घ्यावी. महाराष्ट्र सरकारने सर्व खासगी दवाखान्यांच्या ८०% खाटांवर करोनाच्या उपचाराचे दर नियंत्रित केले आहेत. याबद्दलचा आदेश ३१ मे २०२१ पर्यन्त लागू राहील, अशी घोषणा झाली आहे. या ८०% खाटांवर यापेक्षा जास्त दर कुठलेही रुग्णालय रुग्णाकडून घेऊ शकत नाही – 

कमाल ४,०००/- रुपये  -

अतिदक्षता विभाग- वेंटीलेटर न लावलेला- दर दिवसासाठी कमाल ७,५००/- रुपये 

अतिदक्षता विभाग - वेंटीलेटर सहित- दर दिवसासाठी - कमाल ९,०००/- रुपये 

वरील दरामध्ये साधारणपणे केल्या जाणाऱ्या सगळ्या टेस्ट, नर्सिंग, ऑक्सिजन, डॉक्टर विझीट, औषधे वगैरे सामील आहेत. पी पी ई कीट, काही महागडी औषधे, कोविड टेस्ट, सी टी स्कॅन, एम आर आय वगैरेसाठी वेगळे पैसे द्यावे लागतील, पण त्यावरही बंधन आहे.सगळ्या रुग्णालयांनी तपशीलवार पक्के बिल देणे बंधनकारक आहे. तसे बील देण्यास नकार दिल्यास रुग्ण पैसे भरणे नाकारू शकतो. बिल भरल्यावर रुग्णालयाने पक्की पावती देणे बंधनकारक आहे.रुग्णांनी म.फुले आरोग्य योजने मध्ये आपले नाव नोंदवावे असा आग्रहही धरणे गरजेचे आहे.  महाराष्ट्र सरकारने ३१ ऑगस्ट २०२० ला या विषयावरील पहिले नोटिफिकेशन काढले जे त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२०, १५ डिसेंबर २०२० व २७ फेब्रुवारी २०२१ ला नोटिफिकेशन काढून लागू असलेला कालावधी वाढविला. २७ फेब्रुवारी २०२१ च्या नोटिफिकेशननुसार ३१ में २०२१ पर्यंत नोटिफिकेशन लागू आहे.

अनेक रुग्णांना याची माहिती नसल्यामुळे विशेषतः मोठ्या खाजगी रुग्णालयांनी असहाय्य रुग्णांची भयानक लूट केली. म्हणून आम्ही हे प्रसिद्धी पत्रक प्रसृत करत आहोत. आता रुग्णांना असहाय्य वाटण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील ११० जन संघटनांची  “जन आंदोलनांची संघर्ष समिती” आपल्या पाठीशी भक्कम उभी आहे. रुग्णालये जर अवास्तव बिल आकारात असतील तर आपण आधी संबधित रुग्णालयाला जाब विचारा, आणि जिल्हा / शहर आरोग्य अधिकाऱ्यांची मदत घ्या. तरीही समस्या सुटली नाही तर आपण “जन आंदोलनांची संघर्ष समितीच्या” महसूल विभागीय कार्यकर्त्यांना मदतीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा 

नागपूर (विदर्भ) विलास भोंगाडे  ९८९०३३६८७३,  जम्मू आनंद - ९९२३०२२५४५ 

अमरावती अशोक सोनारकर  ९४२२८४०५५६,    सागर दुर्योधन ७४९९३९०५२३ 

औरंगाबाद (मराठवाडा) सुभाष लोमटे -  ९४२२२०२२०३ , राजन क्षीरसागर - ९८६०४८८८६० 

उत्तर महाराष्ट्र जळगाव सचिन धांडे ९३२६७३५६३६ 

उत्तर महराष्ट अ’नगर सुभाष लांडे ९४२३३९०५९३ 

पुणे इब्राहीम खान -  ९८२२०६६०५०   अरविंद जक्का  ७४४७४३६७६५ 

कोकण ठाणे - गिरीश भावे  ९८१९३२३०६४  उदय चौधरी  ९९६९५००३६१  

असे आवाहन जन आंदोलनाची संघर्ष समिती महाराष्ट्रचे राष्ट्रीय प्रतिनिधी कॉ.अशोक ढवळे,  साथी प्रतिभा शिंदे, श्री.राजू शेट्टी, कॉ.सुकुमार दामले साथी मेधा पाटकर,व राज्य निमंत्रक मंडळ सदस्य   विश्वास उटगी / संजीव साने. / नामदेव गावडे  / अरविंद जक्का / उल्का महाजन / एम.ए.पाटील / डॉ.एस. के. रेगे / किशोर ढमाले / सुभाष लोमटे / सुनीती सु.र / / अजित पाटील / श्याम गायकवाड / ब्रायन लोबो / मानव कांबळे / लता भिसे – सोनावणे / हसीना खान / वैशाली भांडवलकर /  वाहरु सोनवणे /  फिरोझ मिठीबोरवाला यांनी केले आहे.  

हे पण वाचा
https://www.prajasattakjanata.page/2020/07/RSgSVW.html


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com