Top Post Ad

एकही मृत्यू कोरोनामुळे नाही... आणखी एक मास्टर स्ट्रोक 

कोरोना हे WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून रचलेले एक षडयंत्र असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. अनेक तज्ञांनी, अभ्यासकांनी, शोध पत्रकारांनी ही गोष्ट जाहिर केली आहे.. सिद्ध केली आहे. त्यात कोरोना फेक असल्याचा आणखी एक मास्टरस्ट्रोक युरोपियन शास्त्रज्ञांनी नुकताच दिला. डब्ल्यूूूएचओच्या निर्देशानुसार कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नाही. मात्र एका उच्च दर्जाचे युरोपियन पॅथॉलॉजिस्ट डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी त्यांच्या टिममधील रोझमेरी फ्रे आणि मोरी डेव्हरेक्स इत्यादी सहकाऱ्यांसह युरोप खंडातील कोरोनाने मृत्यू झालेल्या काही रुग्णांचे पोस्टमार्टम केले आणि संशोधनांती असे नोंदविले आहे की, संपूर्ण युरोप खंडातून कुणाचाही मृत्यू नोवल कोरोनाव्हायरसमुळे झाल्याचा कोणताही पुरावा त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना मिळालेला नाही. त्यांनी हे देखील उघड केले की, युरोपियन पॅथॉलॉजीस्ट्स यांना SARS-CoV-2 म्हणजे Covid-19 साठी विशिष्ट अशी कोणतीही अँटीबॉडीज आढळली नाही.

त्यामुळे सर्व जगभरात महामारीची भीती आणि अराजक निर्माण करण्यासाठी कोणत्याही आधाराशिवाय महामारीची धोकादायक घोषणा करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूूूएचओला) डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी एक "क्रिमिनल मेडिकल ऑर्गनायझेशन" अर्थात “गुन्हेगारी वैद्यकीय संस्था” असे संबोधले. अशी माहिती डॉ.अलेक्सोव यांची टिम सदस्य रोझमेरी फ्रे यांनी दिली. Corbett Report वर आपण 15 जूनची त्यांची मुलाखत पाहू शकता. तसेच Off-Guardian वरील 2 जूलैचा लेख वाचू शकता.

डॉ.अलेक्सोव हे एक निर्विवाद आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असून, ते 30 वर्षांपासून डॉक्टर आहेत. शिवाय ते बल्गेरियन पॅथॉलॉजी असोसिएशनचे (बीपीए) अध्यक्ष आहेत, तसेच ईएसपीच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आणि बल्गेरियन राजधानी सोफियातील ऑन्कोलॉजी हॉस्पिटलमधील हिस्टोपाथोलॉजी विभागाचे प्रमुखही आहेत. तसेच रोझमेरी फ्रे या कॅलगरी विद्यापीठातील मेडिकल फॅकल्टीतून आण्विक जीवशास्त्रात एमएससी असून सद्या स्वतंत्र मेडिकल रिसर्च जर्नालिस्ट आहेत.

डॉ.अलेक्सोव जे सांगत आहेत त्यास समर्थन देताना जर्मनीतील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर हॅम्बर्ग-एपेनडॉर्फ येथील फॉरेन्सिक मेडिसिन इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. क्लाऊस पेशेल यांनी वेेेबिनार मुलाखतीत सांगितले की, "कोविड-19 च्या प्राणघातकतेबद्दल खात्रीशीर पुरावा नसल्याचे दिसून येते." तसेच “कोविड-19 हा केवळ एखाद्या अपवादात्मक प्रकरणांमध्ये घातक आजार आहे, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये हे एक अत्यंत निरुपद्रवी व्हायरल इन्फेक्शन आहे,” असेेेही डॉ.पेशेल यांनी एप्रिलमध्ये एका जर्मन पेपरला मुलाखतीत सांगितले.

याशिवाय आणखी एका मुलाखतीत डॉ.पेशेल सांगतात की, "बर्‍याच प्रकरणांमध्ये आम्हाला असेही आढळले आहे की, घातक आजारांमधील मृत्यूंशी वर्तमान कोरोना संसर्गाचा काहीही संबंध नाही. कारण त्यात मृत्यूची इतर कारणे आढळली आहेत, जसे मेंदू रक्तस्राव किंवा हृदयविकाराचा झटका. कोविड-19 विशेषतः धोकादायक व्हायरल रोग नाही, मात्र प्रत्येक मृत्यूच्या सर्व अनुमानांची कुशलतेने तपासणी केली गेली नाही हे चिंताजनक आहे."

रोझमेरी सांगतात की, त्या आणि त्यांच्या टीममधील एक पत्रकार मोरी डेव्हरेक्स यांनी 9 जूनच्या ऑफ-गार्डियन लेखात असे प्रमाणित केले आहे की, कोरोनाव्हायरस कोचच्या तत्त्वांची पूर्तता करीत नाही. ही तत्वं एक वैज्ञानिक पद्धती आहे, जी व्हायरस अस्तित्त्वात आहे का आणि विशिष्ट रोगांशी त्याचे परस्पर संबंध आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी वापरले जाते.  

तसेच पुढे त्या म्हणतात आम्ही संशोधन अहवालात नोंदविले की, "आजपर्यंत कोणालाही सिद्ध करता आले नाही की, SARS-CoV-2 हे आजाराचे एक वेगळे कारण आहे, जे त्या सर्व लोकांच्या लक्षणांशी जुळते, ज्यांचा स्पष्टपणे COVID-19 मुळे मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले होते. शिवाय तपासणीत या वायरसला ना वेगळे ठेवले गेले ना पुनरुत्पादित केले. मात्र पुढे तो आजाराला कारणीभूत असल्याचे दर्शविले गेले."

याव्यतिरिक्त, 27 जूनच्या ऑफ-गार्डियनच्या लेखात, टोर्स्टन एंगेलब्रेक्ट आणि कॉन्स्टँटिन डीमीटर या दोन पत्रकारांनी “SARS-CoV-2 RNAचे अस्तित्व विश्वासावर आधारित आहे, वास्तविकतेवर आधारित नाही,” याचा आणखी एक पुरावा जोडला.

अर्थात, वेगवेगळ्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचा आणि कोरोनाचा एकमेकांशी काही संबंध नाही. मात्र त्या रुग्णांच्या मृत्यूंची गणना कोरोनाच्याच नावाखाली केली गेलीय आणि केली जातेय हे स्पष्ट आहे. म्हणजेच एकही मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही हे डॉ.अलेक्सोव यांच्या सर्वेक्षणातून त्यांनी सिद्ध केले आहे.

युरोपियन पॅथॉलॉजिस्ट्स यांनी कोरोना फेक असल्याचे निष्कर्ष मांडल्यानंतर त्यांच्यावर सरकारी यंत्रणेचा दबाव आणला जात आहे. तसेच डॉ.अलेक्सोव यांचे सर्वेक्षण आणि त्या सर्वेक्षणाचे विश्लेषण केलेले रोझमेरी यांचे आर्टिकल चुकीचे ठरविण्यासाठी हॉक्स साईट्सचा वापर करुन बेबनाव केला जात असल्याचे दिसून आले आहे. अनेक पॅथॉलॉजिस्ट्सवर कोरोनाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट बनवून देण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचा दबाव आहे. तसेच WHO च्या प्रोटोकॉलमुळे तोंड उघडता येत नसल्याचे काही पॅथॉलॉजिस्ट्स सांगत आहेत. तर काही पॅथॉलॉजिस्ट्स अशा दबावात चुकीचे काम करण्यास तयार नाहीत.

यावरून ही गोष्ट लक्षात येते की, WHO ने कोरोनामुळे झालेल्या मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नसल्याचे निर्देश का दिले असावेत. याशिवाय अमेरिकन सरकारच्या CDC आरोग्य संस्थेने अन्य काही आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचे कारण हे कोरोना नोंदवा अशा सुचना डॉक्टरांना आधीच दिलेल्या आहेत. 

WHO आणि CDC च्या अगदी याच गोष्टी भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने लागू केल्या आहेत. 

आतापर्यंत (9 जूलै) जगभरातून साधारण 1 कोटी 21 लाख कोरोना टेस्ट आणि 5 लाख 52 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. तसेच यु.के मधून 2 लाख 87 हजार टेस्ट व 44 हजार मृत्यू तर भारतातून 7 लाख 71 हजार कोरोना टेस्ट आणि 21 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे.

कोरोना म्हणजे साधारण सर्दीचा आजार आहे. आणि केवळ एक साधारण सर्दीचा आजार इतक्या मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण करतोय ही कुणाही सुज्ञांच्या बुद्धीला न पटणारी बाब आहे. सबंध कारोनाची आकडेवारी म्हणजे प्रचंड दिशाभूल आहे. 
कोरोना एक जागतिक अंधश्रद्धा आहे. 
कोरोना एक जागतिक षडयंत्र आहे.

 जर्नालिस्ट हर्षद रुपवते
Article published on: 9 July 2020

Source- https://off-guardian.org/2020/07/02/no-one-has-died-from-the-coronavirus-president-of-the-bulgarian-pathology-association/
https://www.globalresearch.ca/no-one-has-died-coronavirus/5717668

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com