भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तमाम नागरिकांची झालेली वाताहत कोलडमलेली आरोग्य व्यवस्था यावर जागतिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. खास वैद्यकीय सेवा तर दूरच पण लोकांना रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन आणि औषधे देखील मिळत नाहीये. अतिशय चिंताजनक परिस्थिती भारतात निर्माण झाली आहे. यावर परदेशी माध्यमांनी भाजपच्या मोदी सरकारला कोंडीत पकडले आहे
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र ऑस्ट्रेलियन फायनान्शियल रिह्यूमध्ये तीव्र प्रतिक्रिया बघायला मिळाली. व्यंगचित्रकार डेव्हिड रोव यांनी व्यंगचित्रात दाखवले की, भारत देश हत्ती इतकाच विशाल आहे. मात्र आता तो मरणाच्या दारात उभा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हत्तीच्या पाठीवर लाल सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांच्या डोक्यावर पगडी असून एका हातात माईक दिसतोय. हे व्यंगचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अमेरिकेच्या 'द वॉशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्राने 24 एप्रिलच्या आपल्या ओपिनियनमध्ये लिहिले आहे की, भारतातील कोरोनाच्या दुसर्या लाटेचे सर्वात मोठे कारण म्हणजे निर्बंधांमधून मिळालेला दिलासा हे आहे. यामुळे लोकांनी महामारीला गांभीर्याने घेतले नाही. कुंभमेळा, क्रिकेट स्टेडियमवर मोठ्या संख्येने लोक एकत्र जमले.
'द गार्डियन' या ब्रिटीश वृत्तपत्राने भारतातील कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीवर प्रधानमंत्री मोदींना कठड्यात उभे केले आहे. 23 एप्रिल रोजी वर्तमानपत्राने लिहिले आहे - भारतीय पंतप्रधानांच्या अति आत्मविश्वासामुळे देशाला जीवघेण्या कोविड -19 च्या दुसऱया लाटेने विक्रमी स्तरावर नेले आहे. लोक अत्यंत वाईट परिस्थितीत जगत आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेड नाहीत. 6 आठवड्यांपूर्वी त्यांनी भारताला 'वर्ल्ड फार्मसी' म्हणून घोषित केले, प्रत्यक्षात भारतातील 1टक्के लोकांचेही लसीकरण झाले नव्हते.
अमेरिकेच्या 'द न्यूयॉर्क टाइम्स' या वृत्तपत्राने 25 एप्रिल रोजी भारताच्या संदर्भात लिहिले आहे की, एक वर्षापूर्वी जगातील सर्वात कठोर लॉकडाउन लावून कोरोनावर बऱयापैकी मात केली होती, सरकारचे चुकीचे निर्णय आणि येणाऱया अडचणींकडे डोळेझाक केल्याने भारताला सर्वात वाईट स्थितीत पोहोचवले आहे. हाच देश कोरोनाला पराभूत करण्यात यशस्वी उदाहरण ठरू शकला असता.
प्रतिष्ठित टाईम मासिकाच्या 23 एप्रिलच्या लेखात राणा अयूब यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना कोरोनाच्या युद्धात अपयशी ठरवले. या लेखात त्यांनी यावर्षी कोरोनाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तयारी कशी केली गेली नव्हती असा प्रश्न केला आहे. प्रधानमंत्रींवर निशाणा साधताना म्हटले की जबाबदार तो आहे ज्याने सर्व खबरदारींकडे दुर्लक्ष केले. जबाबदार ते मंत्रिमंडळ आहे, ज्याने प्रधानमंत्री मोदींचे कौतुक करताना त्यांनी देशातील कोरोनाविरूद्ध यशस्वी लढा दिल्याचे म्हटले आहे. चाचणी देखील मंदावली आहे. लोकांना भयानक विषाणूची जास्त भीती राहिली नाही.
दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका लेखात ब्रिटिश वृत्तसंस्था बीबीसीने म्हटले आहे की, कोरोनाच्या विक्रमी प्रकरणांमुळे भारताची आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. लोकांना उपचारासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. रुग्णालयात बेड व ऑक्सिजन नाही. आरोग्य प्रोटोकॉलमधील उथळपणा, कुंभमेळ्यात लाखो लोकांच्या उपस्थितीमुळे कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
कोरोनाच्या फैलावामुळे केवळ देशभरच नव्हे, तर जगभर सर्वत्र निर्बंध असतानाही भारतात मात्र काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवेळी मोठ्या लोकसंख्येच्या उपस्थितीत प्रचारसभा झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या कोणत्याही नियमांचं पालन या वेळी झालेलं दिसलं नाही. यासाठी मद्रास हायकोर्टाने सोमवारी (26एप्रिल) भारतीय निवडणूक आयोगाला धारेवर धरलं.'लाइव्हलॉ डॉट इन'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
भारतातील करोना परिस्थितीवर चिंता व्यक्त करणाऱया भूमिका देशातील अनेक बुद्धिवंत, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते मंडळी `ट्वीटर'सारख्या समाजमाध्यमांतून मांडीत असतात. मात्र आता त्यांच्या `ट्विट'वर बडगा उगारण्यात आला आहे. ही सर्व `ट्विटस्' हटविण्याचे फर्मान आता सुटले आहे. हे खरे असेल तर हा मुस्कटदाबीचाच प्रकार आहे,' असा संताप शिवसेनेनं व्यक्त केलाय. अर्थात, 'गेल्या काही दिवसांत केंद्र सरकारनं हालचाल सुरू केली आहे. अनेक चांगले निर्णय घेतल्याचंही शिवसेनेनं मान्य केलं आहे. त्यामुळं व्यवस्थेचा हत्ती लवकरच उभा राहील, अशी आशाही शेवटी व्यक्त केली आहे.
परदेशात भारताबद्दल सध्या काय बोलले जात आहे यावर शिवसेनेनं प्रकाश टाकला आहे.करोनाबाबत अफवा पसरवू नका या मोदींच्या वक्तव्यावर शिवसेनेनं टोला हाणला आहे. 'मुळात अफवा कोण पसरवीत आहेत? मनमोहन सिंग, राहुल गांधी, केजरीवाल, उद्धव ठाकरे, प्रियंका गांधी, ममता बॅनर्जी करोनासंदर्भात अफवा पसरवतात व त्यामुळं देशाची स्थिती गंभीर झाली असं कुणाला वाटत असेल तर देशातील गंभीर स्थितीबाबत जगभरातील प्रसारमाध्यमांनी मांडलेली चिंता समजून घेतली पाहिजे,' असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.
जिनेव्हा: जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयस यांनी सोमवारी भारतातील करोना परिस्थितीवर (WHO on India Covid crisis) चिंता व्यक्त केली आहे. करोनामुळे भारतातील परिस्थिती हृदयद्रावक असल्याचे त्यांनी म्हटले. भारतातील करोनाचे संकट दूर करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना सर्व मदत करत असल्याचेही त्यांनी म्हटले. जागतिक आरोग्य संघटनेला जेवढे प्रयत्न करता येतील, तेवढे प्रयत्न सुरू आहेत. आवश्यक उपकरणे आणि इतर मदत दिली जात आहे. यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, प्री फेब्रिकेटेड मोबाइल फिल्ड हॉस्पिटल आणि प्रयोगशाळांचा समावेश आहे. त्याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओ आणि टीबीसह इतर आरोग्य विषयक मोहिमांसाठी 2600 तज्ञांचे पथक भारताच्या अधिक्रायांसोबत काम करण्यासाठी पाठवले असल्याचे टेड्रोस यांनी सांगितले.
0 टिप्पण्या