संपूर्ण घोडबंदर परिसराला अनधिकृत बांधकामांचा विळखा

 


अनधिकृत बांधकामाचे शहर म्हणून नावाजलेल्या ठाण्यातील अनधिकृत बांधकाम पावलोपावली वाढतच चालले आहे. संपूर्ण घोडबंदर रोड परिसरातील आजूबाजूच्या गावात आणि नगरात प्रचंड गतीने बेकायदेशीर कामे सुरु आहेत. केवळ एक हातोडा मारायची तकलादू कारवाई करणाऱया महापालिकेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष राहिले आहे.  

 

ओवळा टकडा, पानखडा गावात ट्रस्टच्या जागेवर अनधिकृत चाळीचे साम्राज्य पालिकेच्या अतिक्रमण  विभागाच्या आशिर्वादाने सुरु आहे. इतकेच नव्हे तर नागला बंदर परिसरातील बुटानिय कंपनीच्या जागेवर मैंग्रोसची कत्तल करून ही अनधिकृत बांधकामे उभी रहात आहेत. भाईंदर पाडा सर्व्हिस रोड, वाघाबिल जुना गाव गुरुचरण जागेवर अनधिकृत चाळीचे साम्राज्य, तसेच महानगर पालिकेच्या शाळेचे आरक्षण असलेल्या भूखंड न्यू होराई झोन शाळेच्या मागे पाणी टाकी जवळ अनधिकृत चाळी उभ्या रहात आहेत. मात्र याकडे पालिका अधिकारी बघण्यासही तयार नाहीत. याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यास त्या कार्यकर्त्याचीच तक्रार या भूमाफियांकडे केली जात असल्याची चर्चा होत आहे.   
काही ठिकाणी तर ओ.सी./सी.सी. नाही. खोटी कागदपत्रे दाखवून चढ्या भावाने फ्लॅटची विक्री करत आहेत. महानगर पालिकेकडून सर्व सुविधा विनाविलंब मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिक कोणतीही विचारपूस न करता येथे आकर्षित होत आहे. याचा फायदा बांधकाम व्यावसायिक उचलत आहेत.  स्थानिक नगरसेवक / लोकप्रतिनिधी यांनी आपला हिस्सा बांधून ठेवून या अनधिकृत बांधकामांना पाठिंबा दिला आहे  ठाणे महापालिका मानपाडा-माजिवडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त तसेच अतिक्रमण विभागाचे उपायुक्त यांचे हात ओले झाल्याने कारवाई तर सोडा पण या परिसराकडे येण्याचेही टाळतांना दिसतात. या परिसरातील गावठाणाच्या आणि गुरुचरण जागांमधून तर सर्रासपणे चाळी उभ्या राहत आहेत. इतकेच नव्हे तर मैदानाच्या जागाही आता हे भूमाफिया ताब्यात घेत आहेत.   
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या