Top Post Ad

मत विभाजन कोणामुळे होतेय


 विविधतेने नटलेल्या भारत देशावर गेल्या ७४ वर्षापासून मुठभर सवर्णांची अमर्याद  आणि निरंकुश सत्ता आहे....!! इथला ओबीसी,एस.सी.एस.टी.अल्पसंख्याक  सत्तेच्या आणि निर्णयप्रक्रियेच्या बाहेर आहे.ते संख्येने बहूजन आहेत आणि म्हणून इथं लोकशाही नाही, लोकांच्या हातात सत्तेची सुत्र नाहीत. इथल्या निर्णय प्रक्रियेत ओबीसी, एस. सी. एस. टी. अल्पसंख्याक लोकांचा सहभाग नाही.हा लोकशाहीचा मुदडा पाडण्याचा प्रकार आहे...!!   कॉंग्रेस आणि भाजपा दोन्ही सवर्णांचे राजकीय पक्ष आहेत. आणि दोन्ही राजकीय पक्ष लोकशाही विरोधी पक्ष आहेत. कॉंग्रेस सरंजामी वृत्तीचा तर भाजपा हुकुमशाही वृत्तीचा आहे. एक नागनाथ तर दुसरा सापनाथ आहे.दोघांमध्ये तसूभरही अंतर नाही...!!  कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकाळात काही घराण्यांच्या हातात सत्ता एकवटणे आणि भाजपच्या कार्यकाळात दोन चार लोकांच्या हातात सत्ता एकवटने एवढाच फरक आहे...!!   कॉंग्रेस पक्षाने १९७५ साली आणिबाणी घोषित करुन आम्ही लोकशाही विरोधी आहोत हे जगजाहीर केले. तर गेल्या दहा वर्षापासून अघोषित आणिबाणी लागू करुन भाजपाने आम्ही लोकशाही विरोधी आहोत हे जगजाहिर केले...!! 

 धोरण आणि कृती दोन्ही आघाड्यांवर कॉंग्रेस आणि भाजपा मध्ये  कमालीचे साम्य आहे आणि म्हणून ते दोन्ही राजकीय पक्ष वेगवेगळे जरी वाटतं असले तरी ते धेय्याने एकच आहेत...!!  दोन्ही पक्षांचं धेय्य सवर्णांच्या हातात सत्ता अबाधित ठेवणे हेच आहे...!!  सत्तेसाठी  वाट्टेल ते करायला निघालेले सवर्ण साम दाम दंड भेद नितीचा अवलंब करून बहूजनांना भयभीत करतात. हा त्यांचा सत्तेसाठी राबवायचा अजेंडा आहे...!!  गेल्या ७४ वर्षापासून इथल्या कॉंग्रेशी सवर्णांनी नियोजनबद्ध पद्धतीने मुस्लिम समुहाला भयभीत करीत,  धार्मिक दंगली घडवून, पराकोटीचा अन्याय अत्याचार करून भयाची पेरणी केली आणि मुस्लिम नेतृत्वाच्या तोंडून इस्लाम खतरे में है. असं सांगितलं आणि मुस्लिम समुहाची मते ओरबाळली आणि सत्ताधारी झाले. कॉग्रेस पक्षाला सत्ता मिळाली मात्र मुस्लिम समुह आजही सुरक्षित नाही. त्यांची मॉब लिचिंग होतेच,औरंगजेब प्रकरण तापवल्या जातेचं,हे वास्तव आहे...!! 

भाजपाच्या सवर्णांनी मुस्लिम समुहाची भिती दाखवतं हिंदू खतरे में है. असं  हिंदू धार्मिक संघटनांच्या तोंडून हिंदू ना सांगितले हिंदू मते ओरबाळली आणि दहा वर्षे सत्ता ऊपभोगली. त्यांच्यांच दहा वर्षांच्या कार्यकाळात भीतीपोटी २१ लाख हिंदू कुटुंबानी देशाचे नागरिकत्व सोडून दिले आणि परदेशी स्थाईक झाले.शेतकरी आत्महत्या करतोय, ओबीसी ची जनगणना होतं नाही.भाजपच्या राजवटीत हिंदू सुरक्षित नाही हे वास्तव सिद्ध झाले आहे...!!  गेल्या ७४ वर्षाच्या सांसदीय लोकशाही मध्ये संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं "कल्याणकारी राज्य" निर्माण करण्याऐवजी मुठभर सवर्णांचे निरंकुश राज्य निर्माण केल्या गेले आहे....!!  सवर्णांचे निरंकुश राज्य निर्माण करण्यासाठी कॉंग्रेस आणि भाजपा हे दोन्ही राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. सवर्णांचे निरंकुश राज्य निर्माण करण्यासाठी "भयाची पेरणी करणे" वेगवेगळ्या समुहाला भयभीत करुन त्या समुहाची मते लाटणे आणि सत्ताधारी बनणे हा सवर्णांचा अजेंडा आहे...!! 

 २०२४ च्या निवडणुकीत आंबेडकरवादी समुहाला भयभीत करण्यासाठी "संविधान खतरे में है "असा पवित्रा घेतला आणि आंबेडकरवादी समुहाला भयभीत करुन त्यांची मते लाटण्याची योजना आखल्या गेली आहे...!!  सर्वसामान्य आंबेडकरवादी मतदाराला भयभीत करण्यासाठी "विचारवंत" असा शब्द प्रयोग करीत काही बुजगावणे पुढे करण्यात आले आहेत...!!  २०२४ च्या निवडणुकीत काही "विचारवंतांनी" संविधान वाचविण्यासाठी मविआ ला मते द्या असा प्रचार सुरू केला आहे...!!  महाराष्ट्रातील मविआ मध्ये किती आंबेडकरवादी उमेदवार आहेत.? मविआ मध्ये किती मुस्लिम उमेदवार आहेत.? मविआ मध्ये किती ओबीसी उमेदवार आहेत.? आंबेडकरवादी, मुस्लिम, ओबीसी या समुहाचे प्रतिनिधी नसलेल्या मविआ ला मते देऊन आम्ही सवर्णांची घराणेशाही अबाधित ठेवतं आहोत हे विचारवंत म्हणवून घेणाऱ्या बुजगावण्यांना कळतं नाही का.?? लोकशाही वाचवायची आहे मग घराणेशाही कायम ठेवून लोकशाही कशी वाचेल.?? हा साधा विचार ज्यांना सुचतं नाही ते "विचारवंत" कसे.??  आंबेडकरवादी समुहाचं प्रतिनिधित्व करणा-या वंचित बहूजन आघाडी आणि बसपा मुळे मत विभाजन होते असा तर्क देणा-या एकतर्फी विचारवंतांना नेमकी सत्ता कुणाची हवी आहे.??  औरंगाबाद  येथील  मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यात आंबेडकरवादी समुहाचं  सतत सतरा वर्षे अन्याय,अत्याचार करीत जगणं कठीण करुन सोडणा-या कॉंग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आणून संविधान शाबूत राहिलं का.?? 

         आंबेडकरवादी विचारवंतांनो  कॉंग्रेस पक्षाने ६० वर्षे सत्ता ऊपभोगूनही मुस्लिम समुहाला सुरक्षितता प्रदान केली नाही. ओबीसी जनगणना केली नाही. गॅट करार करून शेतकरी देशोधडीला लावला.१९७५ साली वचन देऊनही गरीबी हटवू शकले नाही, दलितांना सुरक्षितता देऊ शकले नाही. आदिवासी समुहाला सुरक्षितता देऊ शकले नाही.  लोकशाही मजबूत करण्याऐवजी घराणेशाही मजबूत केली.हे वास्तव विसरून तुम्ही मविआ ची वकीली कशासाठी करता आहात.?  २०२४ ची निवडणूक म्हणजे संविधान वाचविण्याचा लढा नसून सवर्णांची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी चा हा बनाव आहे...!! यापूर्वी सवर्णांचा अजेंडा होता, इस्लाम खतरे में है. ते मुस्लिम धर्मगुरूच्या तोंडून सांगितले जायचे.मुस्लिम मते ओरबाडून सत्ता सवर्णांच्या हातात द्यायची...!!  त्या नंतर हिंदू खतरे में है. असा अजेंडा आला ते हिंदू संघटनाच्या साधू, प्रवचनकार तथा महाराज यांच्या तोंडून सांगितले जायचे आणि सत्ता सवर्णांच्या हातात द्यायची...!!  सवर्णांनी  आपल्या सत्तेसाठी षडयंत्र रचले आहे आणि नवा फंडा आणला आहे "संविधान खतरे में है."असे म्हणतं आंबेडकरवादी मते ओरबाडून सत्ता सवर्णांच्या हातात देण्यासाठी आंबेडकरवादी "विचारवंतांचा" वापर करायचा आहे...!! 

 तुम्ही "विचारवंत" असाल तर सारासार विचार करा...!!  भयभीत होऊन सवर्णांच्या राजकीय पक्षांची एकतर्फी वकीली करु नका...!!   आंबेडकरवादी राजकीय पक्षांना संपविण्याच्या षढयंत्राचे भारवाहक बनु नका...!!   डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथात म्हणतात इथला प्रत्येक संघर्ष हा सत्तेचा संघर्ष आहे. आणि प्रतिक्रांती वादी त्यांच्या सत्तेसाठी तुमचा वापर करीत आहेत. याचे भान तुम्हाला असायला हवे...!!  तुम्ही सवर्णांच्या अर्थात प्रतिक्रांतीवाद्यांच्या बाजूने उभे राहून आंबेडकरवादी राजकीय पक्षांना टार्गेट करीत आहात ही अतिशय खेदाची गोष्ट आहे...!!  मत विभाजन केवळ आंबेडकरवादी मतांमुळेच होतेय का.?   सवर्ण मुठभर आहेत आणि सर्वच राजकीय पक्षात आहेत ते कधीतरी मत विभाजन म्हणून आपल्या समुहाला वेठीस धरतात काय.?   आंबेडकरवादी विचारधारेचे राजकीय पक्ष संपले तर संविधान वाचते.लोकशाही शाबूत राहते हा तर्क तुम्हाला पटतो का.?  स्वतः ला "विचारवंत"म्हणवून घेत "कु-हाडीचा दांडा गोतास काळ " अशी कृती तुमच्या हातून घडतेय....!!  सवर्णांच्या हातचे बाहुले बनून तुम्ही राजकीय भुमिका घेतं आहात...!! सदसद्विवेक बुद्धीचा अभाव, तर्क शक्ति चा अभाव, भयग्रस्त अवस्था, ऐतिहासिक संदर्भाची कमतरता,असलेल्या लोकांना विचारवंत या श्रेणीत बसवता येतं नाही...!! 
 आणि म्हणून तुमच्या मुळे "विचारवंत" हा शब्द बदनाम होत आहे...!! 

 भास्कर भोजने.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com