Top Post Ad

खाल्ल्या ताटात तंगडी वर करणारे कांहीं आयपीएस !


परम बिरचं पत्र माझ्याच नव्हे तर महाराष्ट्रातील असंख्य पोलिसांच्या मनात तिडीक निर्माण करून राहिलेय. कसाही विचार केला तरी शरमल्या सारखे वाटते. परम बीरने असे लीहून सगळ्या पोलिसांना बदनाम का केले? परम बीर, रश्मी शुक्ला आणि त्याच्या आयपीएस भावाना व बिरादरीला उत्तर द्यावेच लागेल! *मुंबईतील सुमारे ८० टक्के पोलिस कर्मचारी( शिपाई ते जमादार ) ग्रामीण भागातील असतात. इतर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यं प्रमाणे यांना गुन्हा अगर अर्ज तपासाचे काम दिले जात नाही. त्यांना अधिकार नसतात.त्यांना चेहरा नसतो. बक्कल नंबर हीच त्यांची ओळख *धार्मिक सण उत्सव, इमारत कोसळने, अपघात, पावसाळा, दंगली इत्यादी हाताळण्यासाठी यांना अगणित काळ घराबाहेर राहावे लागते. *रस्त्यावर कुणीही राजकारणी याला "वर्दी उतरविन" असा किंवा "गडचिरोलीला पाठविन" असा दम भरतो. *पुरुष जावू द्या पण मद्यधुंद अबलाही याची कॉलर पकडतात. *परम बीर सारख्याच्या घरी ऑर्डरली म्हणून कुत्रे फिरवून आणण्याचे घर काम करण्याचे व्रत याला पाळावे लागते. *घरी, दारी, सरकार दरबारी हा शिपाई - एक तळाचा शूद्र माणूस म्हणून गणला जातो. *आणि परम बीर तुझ्या पत्रामुळे सगळ्या देशभर डंका पिटला गेला की हे मुंबई पोलीस मंत्र्याला एवढा पैसा देतात तर स्वतःला किती घेत असतील? हे बहुतेक जण (सुमारे ७० टक्के)कृषि व ग्राम्य संस्कृतीतून आलेले आहेत. त्यांचा असा एक आत्म सन्मान(self esteem) असतो. अन्न वस्त्र,निवारा इतकाच मूलभूत. सगळेच तुझ्या सारखे राजकारण्यांचे जोडे सांभाळत व मेल्या मढयावरच लोणी जमा करण्यासाठी हपापलेले नाहीत! पोलिस भ्रष्टचार बद्दल फार बोलल लिहिलं जात. तो इतर विभागापेक्षा दृश्य स्वरूपात असतो. तो या कांहीं मोजक्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी पाण सुपारी, चाय पाणी,... अशा फुटकळ स्वरूपाचा असतो. पण फारच थोड्या पोलिसांचा जनतेशी प्रत्यक्ष संबंध येतो. वाझे, परम बीर, रश्मी शुक्ला सारखे भाग्यवान मोजकेच असतात. मुंबई पोलिसांची कार्य तत्परता, तपास, कायदा सुव्यवस्था राखणे, परकीय नागरिकांशी वागणे.... या बद्दल मोठी गौरवशाली परंपरा आहे. दत्ता सामंत आंदोलनात चांदगुडे नावाचा अधिकारी मारला गेला होता. अयोध्या घटनेनंतर झालेल्या दंगलीत फौजदार गोखले सह सहा पोलिस ठार झाले होते. २६/११ च्या घटनेत अनेक जण जखमी झाले. करकरे, कामटे, साळसकर, हे अधिकारी शहीद झाले. ओंबळेनी तर अतुलनीय शौर्य दाखविले. मुंबई व्यतिरिक्त नक्षल भागात अनेक पोलिस ब्लास्ट, गोळीचे शिकार बनलेले आहेत. मला हे जाहीरपणें मांडण्याचा नैतिक अधिकार आहे. नोकरीच्या पहिल्याच पनवेल येथील नेमणुकीत 22वर्षे फरारी असलेल्या राम श्याम दरोडेखोराना पकडताना चकमकीत मला गोळ्या लागल्या होत्या. भारतातील जातीय दंगली समुळ नष्ट करण्याचे मॉडेल निर्माण केल्याने युनो, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, चीन येथील जागतिक परिषदेत मला निमंत्रित करण्यात आले होते. ....आणखी बरेच. दर वर्षीचे पावसाळ्यात मुंबई पोलीस जीव ओतून काम करतात. कोरोणा काळातील पोलिस कामगिरी तर अतुलनीय आहे. अनेक जणांनी जीव गमावला. तमाम जनतेने पुष्प वृष्टी करत पोलिसांना मानवंदना दिली! आणि परम बीर तू काय केलेस या दलासाठी? तुझ कर्तृत्व काय ते सांग! तुझी पाप सांग? आता नाही सांगितलस तरी ज्या पोलिसांना तू बरबाद केलं ते पुढं येतीलच. तुझ्या एका पत्रानं सगळा समाज या दलाकडे संशयाने पाहतो. प्रत्येकाच्या नजरेत आम्ही त्यांना तू आणि रश्मी दिसतो. तुझ्या आयपीएस बिरादरीचे अनेक निवृत्त अधिकारी पेंशन खात,त्यापैकी कांहिजन रवंथ करत बसलेत. त्यांनी पुढे यायला पाहिजे. परम बीर व रस्मीच्या विधानावर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. पण ते पुढं येणार नाही. बोलणार नाही. परम बीर, रस्मी आणि मंडळी हे परप्रांतीय. त्यांना मुंबई, महाराष्ट्र ही स्वतःचे घर भरायला सुपीक जागा. इथली मानसं, पोलिस दल याबद्दल ना आस्था ना प्रेम. अजीर्ण होईपर्यंत इथलं खातील. खाता खाता व जाताना त्याच ताटात तंगडी वर करतील. केलेच. महाराष्ट्र आयपीएस असोसिएशनने जाहीर पत्रक काढावे. तसेच या प्रवृत्ती बद्दल वसंत सराफ, , ए एन रॉय, के के कश्यप, एम एन सिंग, पसरिचा, पी के बी चक्रवर्ती, राहुल गोपाळ, संजीव दयाळ, अरुप पटनायक, संजीव बर्वे, राकेश मारिया आदी अधिकाऱ्यांनी अभिप्राय नोंदवावा
पण मी लिहून देतो. यावर कुणी बोलणार नाहीत कारण हे सर्व जन या व्यवस्थेचे निर्माते (creator), संवर्धक (guardian) लाभार्थी (beneficiary) हेत! माझी व यांची गलेलठठ पेंशन सामान्य जनतेच्या (stake holders) घामातून दिली जाते! मनुस्मृतीच्या प्रभावा खाली फोफावलेली ही मुजोर नोकर शहांची फौज राजकारण्यांना जुमानत नाही. त्यासाठी आपण लोकशाहीच्या सगळ्या भागीदाराणी (stake holders ) पुढाकार घ्यायला पाहिजे! आम्ही व्यूहरचना (road map) आखलेली आहे तसा पुढाकार घेवू या! सुरेश खोपडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com