जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसा या गावात गेलो. मातंग समाजाच्या शेतकर्यांन मोठय़ा ऊसतोडी करून मोलमजुरी करून स्वतःच्या कष्टाने कमावलेली शेती शेजारच्या स्वत:ला वरच्या जातीचा समजणाऱ्या अल्पभूधारकाच्या डोळ्यात आली आपल्याला नाडण्याचा आणि त्याच्यावर अन्याय करण्याचा अधिकार असल्याचा गैरसमज यांच्या डोक्यात ठासून बसला आहे. पोलीस स्टेशन म्हणजे आपल्या नेत्याचे नोकर आहेत हा अविर्भाव आणि पिडीतांची बाजू घेणारे कोणीच नाही ही खात्री. या फाजील आत्मविश्वासापोटी आपणच जमीन बळकावयाची आणि आपणच त्यांना मारहाण करायची आणि आपणच पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करायची असा प्रकार झाला.
वालसा गावात मातंग समाजाचे बहुसंख्य इच्चे आडनाव असणारे लोक आहेत.पैकी बरेच लोक दुरडी फडे टोपल्या तयार करून विकतात तर मिळेल ती मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात तर काही लोकांकडे पोटापाण्यापुरती शेती आहे. पीडित कुटुंबाने स्वकष्टाने कमावलेल्या आपल्या शेतात राबतात. शेतीच्या मोजणीचे नाटक करून जाणीवपूर्वक तलाठी व तहसीलदार यांच्याकडून फेरफार करून घेतला आणि मातंग जातीच्या लोकांवर ही शेती आमची आहे अशी बळजबरी 2017 पासून करने चालू केले. यावर्षी यांनी शेतात तूर पेरली आणि त्यांनी जबरदस्ती करून आपल्या घरी नेली इच्चे कुटुंबीय फिर्याद द्यायला पोलीस स्टेशनला गेले तर पोलिसांनी आम्हालाच बाहेर हाकलले. मग त्यांची हिम्मत वाढली माझे बाबा आई आणि इतर नातेवाईक शेतात काम करत असतांना त्यांनीच आमच्या शेतात नांगर घातला. आणि आम्हाला एवढी मारहाण केली की दवाखान्यात असलेले माझे काका कायमचे अपंग होतात की काय ही भीती दहावीत असलेल्या बिचार्या वर्षाने बोलून दाखवली. तर एक सात आठ वर्षाचा बालक आई व वडील दोघेही दवाखान्यात असतांना एकटाच घरी आहे. तर म्हातारे आईवडील मात्र आमचंच असून आमचा घात झाला असे म्हणतात.
साथीयो निरपराधांना महिलांना मारहाण करून त्यांच्याच विरोधात दरोडय़ाचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत एक गोष्ट निदर्शनास आली की मातंगांच्या लोकांनी त्याच्याविरोधात अकट्रॉसिटी दाखल केली की ते मातंगांच्या विरोधात हमखास दरोडय़ाचा गुन्हा नोंदवून पोलिसांना हाताशी धरून जाणीवपूर्वक अडचणीत आणणार आणि मग पोलीस किंवा मध्यस्ती दलाल वा वकील हे प्रकरण मॅनेज करणार. मग ज्यांना कायदा माहीत नाही ते मात्र घाबरून अन्याय सहन करणार हे ठरलेलं. वालसाच्या प्रकरणात काहीसे असेच होण्याची शक्यता आहे. पण लहुजी क्रांती मोर्चा हे होऊ देणार नाही. कारण आमच्या मायबहिणीच्या अंगावर हात घातल्यानंतर प्रकरण मिटवण्याचा नावावर दलाली करणार्यांना आम्हीच दणका दिल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाच्या काळ असल्यामुळे जखमींना भेटता आले नाही त्यांची भेट लवकरच लहुजी क्रांती मोर्चा घेऊन त्यांना सर्व प्रकारची कायदेशीर मदत करेल.
नंदाताई लोखंडे
राज्य संयोजिका- लहुजी क्रांती मोर्चा
मो नं 8308640914
0 टिप्पण्या