Top Post Ad

नंतरच्या काळात भाजपने माझी व्होटबँक फोडली


नवी दिल्ली: 

एका हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते उदीत राज यांनी भाजपवर आगपाखड केली. भाजपमध्ये दलित नेत्यांना काडीची किंमत नाही. अगदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून दुय्यम वागणूक दिली जाते, असा आरोप  उदित राज यांनी केला. या चर्चेदरम्यान भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला, ‘माझी भाजपमध्ये राहण्याची लायकी नव्हती’ असे बोलून गेले. यावर उदित राज यांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली.  भाजपच्या प्रवक्त्याने देशाचे राष्ट्रपती दलित आहेत, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यावर उदित राज आणखीनच चवताळले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भाजपचे नेते किंमत देत नाहीत. रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर उभे राहतात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपतींनी हात जोडून नमस्कार केला तर मोदी त्यांचं अभिवादनही स्वीकारत नाहीत, असे उदित राज यांनी म्हटले.

उदित राज यांच्या या वक्तव्यामुळे भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्लाही चांगलेच संतापले. काँग्रेसमध्येच दलितांना कोणतीही किंमत नाही. भाजपने तुम्हाला खासदार केले, पण काँग्रेसने तुम्हाला काय दिले? तुमची काँग्रेसमध्ये काय पत आहे?, असा सवाल प्रेम शुक्ला यांनी उदित राज यांना विचारला. या सगळ्या हमरीतुमरीमध्ये उदित राज यांनी भाजपच्या प्रेम शुक्ला यांचे आभार मानले. तुम्ही आज खरी गोष्ट जगासमोर आणलीत. भाजप आणि आरएसएसची विचारसरणी लोकांना कळाली.   खासदारकीच्या उमेदवारीसाठी भाजप माझ्या दारावर आली होती. नंतरच्या काळात भाजपने माझी व्होटबँक फोडली, असा पलटवारही उदित राज यांनी केला.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com