घंटाळी प्रबोधिनी संस्था विद्यमाने सीझन बॉल क्रिकेट प्रशिक्षण

 


घंटाळी प्रबोधिनी संस्था,ठाणे व  विलास सामंत मा. नगरसेवक शिवसेना ह्यांच्या विद्यमाने व पुढाकाराने सीझन बॉल क्रिकेट प्रशिक्षण ८ ते १४ वयोगटातील मुले  व मुलीनंसाठी घंटाळी मैदान येथे सुरु करण्यात आले आहे  प्रशिक्षणाचा  शुभारंभ १९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या शुभ दिनी क्रिकेटर सदानंद भिसे ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या वेळेस क्रिकेटर किशोर ओवळेकर, सुशील म्हापुस्कर, रंजीपटू श्री.संदीप दहाड, ICC level 1 प्रशिक्षक भरत शर्मा, खेळाडू, त्यांचे पालक व इतरही मान्यवर उपस्थित होते.

घंटाळी प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष विलास सामंत व विश्वस्त .चैतन्य सामंत ह्यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला आणि गरजू व मध्यम वयोगटातील खेळाडूंना ह्याचा लाभ मिळेल ह्याची खात्री दिली. ह्या प्रशिक्षणाची धूवा राज्यस्तरीय क्रिकेटपटू सागर जोशी व  कमलाकर कोळी ह्यांच्याकडे असेल आणि रंजीपटू मयूर कद्रेकर ह्या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करतील. . हे प्रशिक्षण महिन्यातील दर शनिवार व रविवार सकाळी ७ ते ९ ह्या वेळेत माफक शुल्कात दिले जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क:-
सागर जोशी:-९०२२०३५३९७
नम्रता ओवळेकर राणे:-९९२०७८१७००

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या