Trending

6/recent/ticker-posts

हे अभियान म्हणजे २०२४चा निवडणूक प्रचार

अयोध्येतील नियोजित श्रीरामजन्मभूमी मंदिर हे पूर्णपणे जनतेच्या आर्थिक सहभागातूनच उभे राहणार असून संक्रांतीपासून म्हणजेच १५ जानेवारीपासून त्यासाठी निधी संकलन सुरू होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव, तसेच विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपतराय यांनी दिली. निधी संकलन हे मकर संक्रांतीपासून सुरू होणार असून ते माघ पौर्णिमेपर्यंत जारी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

‘अयोध्येत ठिकाणी उभारण्यात येणा-या भव्य मंदिरासाठी देशभरातील प्रत्येर राम भक्ताची मदत घेतली जाणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते प्रत्येक घराघरात जातील,’ या निधी संकलन कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते चार लाख गावांच्या ११ कोटी कुटुंबीयांशी संपर्क साधणार आहेत. तसंच त्यांना श्रीरामजन्मभूमीशी जोडून त्याचा प्रचार करतील. देशातील प्रत्येक जाती, मताच्या, पंथाच्या आणि संप्रदायाच्या लोकांच्या सहयोगातूनच राम मंदिर वास्तवात एक राष्ट्र मंदिराचं रूप घेईल, देशातील गावांमध्ये आणि शहरांमध्ये सुरू करण्यात येणा-या अभियानात भक्तांनी स्वैच्छिकरित्या केलेली आर्थिक मदत स्वीकारली जाणार आहे. तसंच यासाठी १०, १०० आणि १ हजार रूपयांचे कुपन्स उपलब्ध असतील. कोट्यवधी घरांमध्ये या भव्य मंदिराची प्रतीमा पोहोचवली जाणार असल्याचंही चंपतराय यांनी नमूद केलं.

मात्र  याबाबत  शिवसेनेच्या मुखपत्रात  'राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो करसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? असा परखड सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसंच,'श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे. चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024 चा निवडणूक प्रचार आहे. रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबवायलाच हवा' असा सल्लावजा टोला सेनेनं भाजपला लगावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून राम मंदिराच्या मुद्यावरून सेनेनं भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला.

'अयोध्येतील राममंदिरासाठी संक्रांतीपासून वर्गणीचे काम सुरू होणार आहे. 14 जानेवारी म्हणजे मकरसंक्रांतीपासून चार लाखांहून अधिक स्वयंसेवक 12 कोटी कुटुंबांशी संपर्क साधतील. हे स्वयंसेवक गावागावांत जातील, असे विश्व हिंदू परिषदेचे चंपतराय यांनी सांगितले. चंपतराय हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस आहेत. अयोध्येत राममंदिरच व्हावे, असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.  न्यायालयाचा निर्णय होताच पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मंदिराचे भूमिपूजनही झाले. मंदिराचे काम वेगाने सुरू झाले आहे. म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तंबूत विराजमान झालेले रामलल्ला मंदिरात विराजमान होतील. आता या मंदिराच्या निर्माणकार्यासाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्याची ‘टूम’ काढली ती गंमतीची आहे. चार लाख स्वयंसेवक वर्गणीसाठी दारोदार फिरतील. हे स्वयंसेवक नक्की कोण? त्यांना कोणी नेमले आहे? मंदिरनिर्माणाचा खर्च साधारण 300 कोटींच्या घरात आहे.

 मुख्यमंत्री योगी यांनी राममंदिर बांधकामात निधीची चिंता करू नये, असे बजावले आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामाचे मंदिर हे देशाच्या अस्मितेचे मंदिर आहे व त्यासाठी जगभरातील हिंदुत्ववाद्यांनी आधीच खजिना रिकामा केला आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करून काय साध्य करणार? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.'चार लाख स्वयंसेवकांची नेमणूक त्याकामी झाली असेल तर त्या स्वयंसेवकांची पालक संघटना कोणती, हे स्पष्ट झाले तर बरे होईल. वर्गणीच्या नावाखाली हे चार लाख स्वयंसेवक एखाद्या पक्षाचे राजकीय प्रचारक म्हणून घरोघर जाणार असतील तर मंदिरासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक आत्म्याचा तो अवमान ठरेल' अशी टीका सेनेनं केली.

'राममंदिर म्हणजे मालकी हक्काचा विषय बनू लागला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे व त्यावर संत महात्मे मंडळींची नेमणूक मोदी सरकारने केली. या नेमणुकाही शेवटी आपापल्या मर्जीतल्या लोकांच्या झाल्या. त्यावर टीका-टिपण्या झाल्या. आम्ही म्हणतो, ट्रस्टवर जे आले त्यांनी मंदिरनिर्माणाचे काम झपाट्याने पुढे न्यावे व मंदिराचा राजकीय विषय कायमचा बाद व्हावा. आधी 'मंदिर वहीं बनाएंगे' व आता मंदिर आम्हीच बांधले असे दावे-प्रतिदावे कशासाठी? मग दोन्ही कारसेवेत ज्या हजारो रामभक्तांचे बलिदान झाले, ते सर्व लोक अयोध्येतील मठ, मंदिरांत तूपरोटीचा प्रसाद खायला गेले होते की, शरयू नदीत सूर्यस्नानासाठी गेले होते? असा टोलाही सेनेनं भाजपला लगावला.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य
के. परासरन (रामललाचे वकील)
जगतगुरु शंकराचार्य ज्योतिषपीठाधीश्वर स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज (प्रयागराज)
जगतगुरु माधवाचार्य स्वामी विश्व प्रसन्नतीर्थ महाराज (पेजावर मठ, उडुपी)
युगपुरुष परमानंद महाराज (हरिद्वार)
स्वामी गोविंददेव गिरी महाराज (पुणे) -
महंत दिनेंद्र दास (निर्मोही अखाडा, अयोध्या)
विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र (अयोध्या)
अनिल मिश्र (होमियोपेथी डॉक्टर, अयोध्या)
सर्व बामण
कामेश्वर चौपाल (अनुसूचित जातीचे सदस्य, पटना)
या ट्रस्ट बोर्डचे सदस्य बहुमताने 2 प्रमुख सदस्यांची निवड करतील. केंद्र सरकारमधून ही एक प्रतिनिधी या बोर्डमध्ये सहभागी असेल. जो आयएएस अधिकारी असेल आणि त्यांचा दर्जा जॉईंट सेक्रेटरी पेक्षा कमी नसेल. केंद्राचे हे प्रतिनिधी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य असतील. राममंदिर परिसरात विकास आणि प्रशासनाशी संबंधित प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी कमेटीच्या चेअरमनची नियुक्ती ट्रस्ट करेल.नई दिल्ली। विवादित राम मंदिर के मुद्दे में नया तूफान खड़ा होता दिख रहा है।अखिल भारतीय हिंदू महासभा ने विश्व हिंदू परिषद और इसकी सहयोगी इकाईयों पर राम मंदिर के लिए मिले चंदे को हड़पने का आरोप लगाया है।अंग्रेजी अखबार Indian Express के अनुसार महासभा ने कहा है कि अयोधया में राम मंदिर के निर्माण के लिए पूरे विश्व से चंदे आए थे जिसमें 1,400 करोड़ रुपए नकद और कईं कुंतल सोने की ईंटे शामिल की गई थी।जिसे विश्व हिंदू परिषद और उसके सहयोगी इकाईयों ने हड़प लिया है।लेकिन हिंदू महासभा के इस आरोप का विहिप ने खंडन किया है।अखिल भारतीय हिंदू महासभा के राष्ट्रीय प्रवक्ता देवेंद्र पाण्डेय के मुताबिक राम जन्मभूमि न्यास और विश्व हिंदू परिषद के लोगों द्वारा तैयार किए गए नक्शे के मुताबिक मंदिर का निर्माण चार करोड़ रुपए में ही संपन्न हो जाएगा।वहीं विहिप का दावा है कि सारा पैसा पत्थरों की नक्काशी पर खर्च हो गया।पाण्डेय ने विहिप पर आरोप लगाया है कि राम मंदिर के निर्माण के लिए चंदे से इक्ट्ठे से किए पैसे और सोने की ईंटो में भारी हेर फेर हुआ है।

मंदीरातील दानाविषयी अधिक माहिती जाणून घ्या.....
खालील लिंकवर क्लिक करा.....

https://www.prajasattakjanata.page/2021/01/blog-post_8.html

Post a Comment

0 Comments