Top Post Ad

जगांत सर्वाधिक सोने भारतीय देवस्थानाकडें ...

.भारताच्या अर्थमंत्र्यानी जाहीर केल्यानुसार भारताचे वार्षिक उत्पन १ लाख कोटी रु आहे, तर भारतातील मंदिराचे वार्षिक उत्पन्न 22 लाख ५० हजार कोटी रु.आहे. म्हणजेच देशाच्या एकूण उत्पनापेशा अधिक आहे. भारत सरकारजवळ सुमारे ३ हजार २५० टन सोन आहे. मंदिरामध्ये ३०,००० टन सोन आहे. (जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेपेशा कितीतरी पटीने अधिक) आपल्या देशावर असलेल्या कर्जापेक्षा पाच पटीने केरळच्या एकट्या पद्म्नाथस्वामी मंदिराची संपत्ती आहे. म्हणजे एकच मंदिर देशावरचे कर्ज फेडू शकते. तसेच तिरुपती बालाजी , शिर्डी , सिद्धिविनायक यासारख्या बिग बजेट असलेली अनेक मंदिरे भारतात आहेत. या व आशा सर्व मंदिराकडे हजारो कोटीची संपत्ती आहे.

- शिर्डीच्या साईबाबाना प्रत्येक वर्षी हजारो कोटीनी देणगी मिळते. अगदी लॉकडाऊननंतरही मंदीराच्या देणग्यांमध्ये घट झालेली नाही. इतकेच नव्हे तर मंदिराकडे असलेल्या हजारो एकर जमिनी व इतर मालमत्ता  हा सर्व आकडा जर एकत्र केला, तर आपल्याला मोजताही येणार नाही. आता आपण देशातील इतर गंभीर बाबीकडे पाहू....जागतिक बँकेच्या अहवाला नुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपेकी ४१.६ % लोकसंख्या दारिद्रय रेषेखाली जगत आहे, त्याचे उत्पन दिवसाला २० रू आहे. नेशनल कोन्शिल ऑफ अप्लाइड इकॉनामिक रिसर्चच्या अहवालानुसार देशातील ११ कोटी ५० लाख कुटुबाचे महिन्याचे उत्पन साडेसात हजारा पेशा कमी आहे. सेन गुप्ता सर्व्हे रिपोर्टनुसार देशातील ७० % लोकांचे रोजचे उत्पन २० रु आहे. एकीकडे मंदिरात ऐवढा पैशा फक्त पडून आहे, तर दुसरीकडे देशातील लोक भिकेला लागले आहेत. काही लोक स्विस बँकेतील पैसा भारतात परत आणण्यासाठी आदोलन करतात, पण त्यांना मंदिरातील पैसा दिसत नाही. स्विस बँकेतील भारतियाचे २.८ लाख कोटी रु. असल्याचा अदाज आहे. मंदिरातील संपत्तीसमोर हा पैसा चिल्लर आहे...

जगांत सर्वाधिक सोने भारतीय देवस्थानाकडें सर्वाधिक ३४ हज़ार मंदिरें तामिळनाडूत
देशांतील धनंतर देवस्थाने
केरळांतील पद्मनाभ मंदिर एक लाख कोटी रुपयांचे सोने.
आंध्रांतील तिरुपती पस्तीस हज़ार कोटी रुपयांचे सोने.
महाराष्ट्रांतील शिर्डी एक हज़ार + कोटी रुपयांचे सोने.
काश्मीर वेष्णोदेवी पांचशे कोटी + रुपयांचे सोने.
पंजाबांतील सुवर्णमंदिर तीनशें कोटी रुपयांचे सोने.

जगांतील सर्वांत ग़रीब देशांत( भारतांत ) सर्वाधिक सोने देवस्थानाकडें कां? कारण आम्हीं भारतियांनी, आम्हालाच स्वर्गाची लालूच व नरकाची भिती दाखवून अांर्तर्बाह्य असुरक्षित केले.खरा देव-धर्म आम्हाला कधीच कळलेला नाही.कुठल्याही धर्माची तत्वें ही सर्वांचा विकास साधणारीच असतांत."यतो अभ्युदय निश्रेयस् सिध्दि,

सः धर्माः||"ही सांख्य तत्वज्ञानांत कणाद रुषीनें केलेली घर्माची व्याख्या आहें. कुठल्याही कसोटीवर यांत उच्च-निचता बसतच नाही. सर्वांचा सर्वांगीण विकास हाच त्याचा अर्थ होतो.तर मग हिन्दूत्व = बामणवाद याशिवाय दुसरे काय असूं शकतें? 

आतां देव काय? 
कबीर म्हणतांत "आस गयी,चिंता मिटी |मनुवा बेपरवाह,जाको कछु न चाहिये,वही शेनशाह ( ईश्वर ).
माणसालाच देवपण प्राप्त होते.

संत तुकाराम महाराज म्हणतात "अहो कृपावंता | होई बुध्दिचा ये दाता || महाराज ईश्वराला फक्त चांगल्या बुध्दीचे दान मांगतांत. ईश्वराची संकल्पना सांगतांना महाराज म्हणतांत "जयापासोनि सकळ | महीमंडळ हे झाले ||१|| तो एक पंढरीचा राणा | न ये अनुमाना श्रुतीसी ||२||विवादती जयासाठी ||३||जगजेटी तो विठ्ठल ||तुका म्हणे(तो ) आकळ || आहें सकळ व्यापक ||४||  आतां तो ईश्वर जर असा आकळ व सकळ व्यापक असेल तर हे सोनें कुणासाठी?

ज्यांनी सर्वसंगपरित्याग त्याग केला त्यांनाच आम्हीं देव मानले, ज्यामध्ये गाडगेबाबांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते .परंतु आज भोंदूबाबांना आम्हीं देव मानूं लागलो.कारण या व्यवस्थेनें ( हरामखोरांनी )आम्हाला आंतर्बाह्य असुरक्षित केले. बहूसंख्यांकाचा मेंदू सडवला.तेच बाबरी पाडूं लागले, बाँब फोडून बहूसंख्यांकांनाच मारूं लागले. अन्न, वस्र, निवारा, आरोग्य व शिक्षणाकडें पुर्ण दुर्लक्षित करूं लागलें.

संत ज्ञानेश्वर म्हणतांत "स्वर्ग-नरकाच्या कल्पना मुर्खपणाच्या आहेत.  देव ते कल्पित, शास्र ते शाब्दिक, पुराणे बाष्कळिक,

तरी देखील तुम्हीं पोटभरूंच्या कटाला बळी पडून सत्यनारायणाची असत्य पुजा करूं लागलांत याला फक्त तुम्हीं आणि तुम्हीच जबाबदार नाहीत काय? ऊठा सर्वस्वाचा त्याग करतां आला नाही तरी प्रामाणिकपणें समाज प्रबोधन करा

महेंद्र खरात (मुंबई) 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com