Top Post Ad

‘ही तर शेतकऱ्यांच्या कत्तलींचीच तयारी- राकेश टिकैत

 

दिल्ली-उत्तर प्रदेशच्या गाझीपूर सीमेवर दोन महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन बंद करण्यासाठी सरकारतर्फे शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी आंदोलन कर्त्यांचा चक्का जाम करण्याची योजना आखली जात आहे.  यूपी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ४ वाजता धरणे आंदोलन स्थळ चारही बाजूंनी सील केले. पोलिसांच्या प्रचंड फौजफाट्यासह शेतकऱ्यांना जागा रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली.  गाजीपुर आणि सिंघु बॉर्डरवर गुरुवारी दुपारनंतर मोठ्या प्रमाणात दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. गाजीपुरमध्ये विज आणि पाणी सप्लाय बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आज शेतकऱ्यांना रस्ता रिकामा करण्यास सांगितले आहे. मुझफ्फरनगरचे भाजप खासदार संजीव बालियान लोकांशी संपर्क साधून आंदोलनाला पाठिंबा देऊ नये असा संदेश पाठवताना दिसले. आंदोलनाची प्रमुख आघाडी असलेल्या हरियाणाच्या सिंघू बॉर्डरवरही सुरक्षा दलांची तैनाती वाढवली आहे. धरणे स्थळ चारही बाजूंनी सील करण्यात आले आहे. आता तेथे पक्के बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. 

परिणामी रात्रीपर्यंत हरियाणा व प. यूपीत जागोजाग शेतकऱ्यांच्या बैठका झाल्या. रात्री ११ वाजेनंतर अनेक भागांतून शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली. जिंद येथे हायवे जाम केला. हरियाणा-यूपीत रात्रीच खाप पंचायतींनी दिल्लीला जाण्याची घोषणा केली. हरियाणाच्या भिवानीहून १ हजार ट्रॅक्टर्सवर बसून हजारो शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले. दुसरीकडे मीरत, मुझफ्फरनगर, गाझियाबाद, शामली व बागपतहून शेतकऱ्यांनी रात्री ११ वाजेनंतर दिल्लीकडे कूच केली. दोन्ही राज्यांत परिस्थिती चिघळत असल्याचे पाहता गाझीपूर बॉर्डरवर कारवाईच्या आदेशाची प्रतीक्षा करत असलेल्या पोलिसांनी माघार घेण्यास सुरुवात केली.

‘सरकार शेतकऱ्यांचे खून करू पाहत आहे. कृषी कायदे मागे घेतले नाही तर मी आत्महत्या करेन. धरणे स्थळ सोडणार नाही. पाणीही पिणार नाही.’  ही तर शेतकऱ्यांच्या कत्तलींचीच तयारी असल्याचे स्पष्ट मत राकेश टिकैत यांनी व्यक्त केले. 

सायंकाळी ६ वाजता राकेश टिकैत अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत आंदोलन स्थळावरून हटण्यास तयार झाले होते. तेव्हा आंदोलनस्थळी भाजप आमदार नंदकिशोर समर्थकांसह पोहोचले. ते म्हणाले-आंदोलन करणाऱ्यांना रविवारपर्यंत हटवा, अन्यथा आम्ही हटवू, असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर टिकैत भडकले. ते म्हणाले,‘भाजपचा आमदार पोलिस दलासह शेतकऱ्यांना ठार मारण्यासाठी आला आहे. त्यामुळे आता आम्ही कुठेही जाणार नाही.’ त्यानंतर टिकैत यांनी देवेंद्र प्रताप सिंह नावाच्या युवकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले.

गाझीपूर सीमेवर बदलती स्थिती पाहता रात्री १० वाजता मुझफ्फरनगरच्या सिसौली गावात राकेश टिकैत यांच्या घरी ‘गाझीपूर कूच’च्या घोषणा देत गर्दी जमली. जाट नेते रालोद प्रमुख अजित सिंह यांनी टिकैत यांना फोन करून आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा केली. याबरोबरच पूर्ण प्रकरणात जाट राजकारणाचा प्रवेश झाला. मीरत, मुझफ्फरनगर, गाझियाबाद, शामली, बागपत या जाटबहुल गावांतून गाझीपूरसाठी कूच सुरू झाली.

दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकावणाऱ्या व हिंसाचार करणाऱ्यांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. तपासासाठी विशेष टीम स्थापली. आधीच १९ जणांना अटक झाली.पोलिस दीप सिद्धू व गँगस्टर लक्खा सिडाना यांना मुख्य आरोपी मानत आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिस पथके गुरुवारी सायंकाळी सिंघू बॉर्डरवर गेली. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लवकरच ३७ शेतकरी नेत्यांच्या लूकआऊट नोटिसा जारी होतील. हिंसेचा आरोप असलेल्या या नेत्यांना पासपोर्ट जमा करण्यास सांगितले जाईल. दिल्ली पोलिस म्हणाले, नेत्यांच्या चिथावणीखोर भाषणांमुळे हिंसा झाली. त्यांच्याच आवाहनावरून ट्रॅक्टर रॅली झाली. दीप सिद्धू फरार असल्याचे पोलिस सांगत आहेत. दुसरीकडे दीप सिद्धूने आणखी एक व्हिडिओ जारी करत शेतकऱ्यांचे बिंग फोडण्याची धमकी दिली. शेतकरी नेते बलबीरसिंह राजेवाल म्हणाले,‘दीप भाजपचा एजंट आहे. केंद्र सरकारने त्याच्यामार्फत आंदोलनाच्या बदनामीचा कट रचला व आरोप शेतकऱ्यांवर केले.’

. गाजीपुर बॉर्डरवर टिकैत म्हणाले की, 'शेतकऱ्यांवर अत्याचार केला जात आहे. त्यांना मारण्याचा कट रचला जात आहे. सरकारने कायदे परत न घेतल्यास मी आत्महत्या करेल. मी या देशातील शेतकऱ्यांना उद्धवस्त होऊ देणार नाही.' यापूर्वी टिकैत म्हणाले होते की, 'मी सरेंडर करणार नाही, आंदोलनही संपवणार नाही. समाजाची बदनामी करण्याचे हे षडयंत्र आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चौकशी करावी. यात सर्व कॉल रेकॉर्ड सामील करावेत.'

सुत्रांनी सांगितल्यानुसार,  दिल्ली आणि यूपी पोलिस आंदोलकांना हटवण्यासाठी जॉइंट ऑपरेशन करू शकते. उत्तर प्रदेश सरकारने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे आंदोलन संपवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस पोहोचताच गाजीपूर सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी येथे लावलेले पोर्टेबल टॉयलेट्स हटवण्यास सुरुवात केली आहे. यूपी रोडवेजच्या डजनभर बस देखील येथे उभ्या करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे बागपतमध्ये 40 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी बुधवारी रात्री हटवले होते. दुसरीकडे सिंघु सीमेवरही पोलिसांचा फौजफाटा वाढवला आहे.

दुसरीकडे, शेतकरी नेता युद्धवीर सिंह यांनी हिसेंच्या घटनेवर माफी मागत म्हटले की, 'प्रजासत्ताकदिनी जे झाले ते लाजिरवाणे आहे. मी गाजीपूर बॉर्डरजवळ होतो. जे समाजकंटक तिथे घुसले त्यामध्ये आमच्या लोकांचा समावेश नव्हता. तरीही मला हे लाजिरवाणे वाटते आणि 30 जानेवारीला उपवास ठेवून आम्ही प्रायश्चित करु'

रॅलीच्या अटी खंडित केल्याच्या आरोपाखाली 37 शेतकरी नेत्यांविरूद्ध पहिले एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा 20 शेतकरी नेत्यांना नोटीस जारी करुन 'आपल्यावर कायदेशीर कारवाई का होऊ नये, 3 दिवसात याचे उत्तर द्या' अशी विचारणा करण्यात आली.

आतापर्यंत नोटीस दिल्या गेलेल्या 4 नेत्यांची नावे समोर आली आहेत. हे नेते योगेंद्र यादव, दर्शन पाल, बलदेवसिंग सिरसा आणि बलबीरसिंग राजेवाल आहेत. पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्याची तोडफोड करणे देशविरोधी कृती आहे.

टिकैट म्हणाले की, 'सरकार दहशत पसरवण्याचे काम करत आहे. पोलिस-प्रशासनाने असे कोणतेही काम करू नये. जर या प्रकारची कारवाई केली गेली तर सर्व सीमा तेथे आहेत. ठीक आहे ... आणि जे शेतकरी गावांमध्ये आहे तिथे त्यांना संगू. मग काही अडचण आल्यास तेथील स्थानिक पोलिस स्टेशनवर शेतकरी जातील. हे सरकारने लक्षात घ्यावे. अशा प्रकारही कोणतीही हालचाल तिथे झाली तर संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com