ठाण्यातुनही शेतकरी आंदोलनास पाठिंबा, तहसील कार्यालयासमोर घेतली शपथ

ठाणे
शेतकरी आंदोलनाने देशभरात आज नव वर्ष दिवसाचे स्वागत करताना शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम करावा असे जे आवाहन केले त्यानुसार राज्यातील 100 संघटनांचा सहभाग असलेली ""जन आंदोलनांची संघर्ष समिती" च्या वतीने दुपारी 4 वाजता ही शपथ घेण्याचा कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी संजय मं.गो, जगदीश खैरालिया, संजीव साने, गिरीश साळगावकर यांनी या आंदोलनाच्या मागण्या व त्या सरकारने न मान्य केल्यास शहरातील नागरिकांना अन्नधान्याची महागाई, वाढते वीज बील व रोजगारावर होणारे परिणाम याबाबत आपले विचार मांडले.

दुर्गा माळी हिने भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून दाखविली व राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते उमाकांत पावसकर यांनी या दिवसाकरीता खास लिहिलेली शपथ सर्वाना दिली. त्यांनी एक वाक्य वाचले ते इतरांनी रिपीट केले. या कार्यक्रमास राष्ट्र सेवादलाचे उमाकांत पावसकर, NAPM चे संजय मं.गो,  श्रमिक जनता संघाचे खैरालिया, स्वराज इंडियाचे  सुब्रतो भट्टाचार्य व जन आंदोलनांची संघर्ष समितीचे संजीव साने, गिरीश साळगावकर, अनिसच्या वंदनाताई शिंदे, स्वराज अभियानाच्या नीता साने, सुरेश सेठ,  ठाणे मतदाता जागरण अभियानाचे अनिल शाळीग्राम, डॉ. चेतना दिक्षित,  समता विचार प्रसारक संसतेच्या मीनल उतूरकर, अन्न अधिकार आंदोलनाच्या मुक्ता श्रीवास्तव, आदी कार्यकर्ते या शपथ कार्यक्रमात सहभागी झाले होते.


कृषि कायदे येण्यापूर्वीच अदाणीची गोडाऊन कशी काय?
खालिल लिंकवर जाऊन सविस्तर वाचा

https://www.prajasattakjanata.page/2020/12/blog-post_86.html

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या