दिवा प्रभाग समितीची मोठी कारवाई, पाच व्यापारी गाळ्यासह अनधिकृत मजल्यांवर हातोडा

दिवा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडाठाणे
ठाणे महापालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत बांधकामांवर आज धडक कारवाई करून बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 
       गेल्या काही दिवसांपासून दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनानुसार दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी ही कारवाई केली.     यामध्ये गणेश नगर येथील सुरेश पाटील यांनी नव्याने सुरू केलेले 2 वाणिज्य गाळे तोडण्यात आले. तर दिव्यातील महापा रोड येथे लुकमान खान यांचे 5 वाणिज्य गाळे  जेसीबी मशीनच्या सहाय्याने संपूर्ण तोडण्यात आले. तसेच आगासन येथील विनोद पाटील यांनी केलेले जुन्या तळ +3 मजली इमारतीवरील सुरू केलेले 4 थ्या मजल्याचे आरसीसी बांधकाम देखील हटविण्यात आले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad