Trending

6/recent/ticker-posts

मुंबई, पालघर, ठाण्यापाठोपाठ पुण्यातही बहुजन संग्रामचे कोरोना मदत कार्य

मुंबई, पालघर, ठाण्यापाठोपाठ पुण्यात 'बहुजन संग्राम चे' कोरोना मदत कार्य!

   'बहुजन संग्राम' या सामाजिक विधायक, महाराष्ट्र व्यापाक, सेवाभावी संघटनेतर्फे मुंबई, पालघर,ठाणे जिल्ह्यापाठोपाठ दिवाळीच्या पुर्वसंध्येला पुण्यात १२ नोव्हेंबर रोजी सारनाथ बुद्ध विहार,खराडी गावठाण व सातव वस्तीमध्ये लाॅकडाऊनमध्ये रोजगार गमावलेल्या शेकडो कुटुंबांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ,पाच किलो गहू,एक किलो गोडेतेल,एक किलो चणाडाळ, एक किलो साखर,एक किलो मैदा,असा जवळपास एक हजार रुपये किंमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

 बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या पूर्वसंध्येला शिधा किराणा,  अन्नधान्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. त्या प्रसंगी बहुजन संग्रामचे महाराष्ट्रप्रदेश संघटन सचिव राहुल निकम, बहुजन संग्रामचे पुणे जिल्हा महासचिव अमोल गायकवाड,पुणे जिल्हा सचिव सुनील वाघ, संघटक सुबोध निकम,ज्येष्ठ समाजसेवक रतन कांबळे (महाराज) , बहुजन संग्रामच्या पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगलताई कांबळे, उपाध्यक्षा जगदेवी इंगळे, महासचिव वनिता (गुड्डी) किनगी,सचिव निशा ससाणे,  संघटक कमल कांबळे,संघटक उषा ससाने, संघटक बानुबाई उगेनवार, बहजनसंग्रामच्या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा  सुरेखाताई गायकवाड, उपाध्यक्षा लक्ष्मी लोखंडे ,महासचिव मंगल जगताप,सचिव रेखा वाघमारे, संघटक संगीता धोंडे, आदि पुरूष व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली.

     बहुजन संग्राम चे कोरोना मदत कार्य गेल्या 6 महिन्यांपासून अव्याहतपणे सुरू असून हजारो गरजूंना अन्नधान्य देण्यात आले आहे. कोरोना मदत कार्य वाटपाचा 9 व्वा टप्पा पार पडल्यानंतर या 30 नोव्हेंबर पर्यंत 10 वा टप्पा पुण्यातच येथील अण्णाभाऊ साठे हाॅल, गणेश नगर गुंजन टाकीजवळ, शेकडो विधवा, परित्यक्ता, निराधार गरजू महिलांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा किराणा देण्यात येईल.अशी माहिती बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेश संघटण सचिव राहुल निकम यांनी दिली आहे.नाशिक, जळगाव,औरंगाबाद,बीड,लातूर, कोल्हापूर,नागपूर येथेही बहुजन संग्राम कोरोना मदत वाटप  करणार असून 31 डिसेंबर अखेरपर्यंत मदत वाटपाचा उपक्रम  सुरूच राहणार असल्याची माहितीही राहुल निकम यांनी दिली आहे
      डिसेंबर अखेरपर्यंत सुरू राहणाऱ्या या सेवाभावी व  मानवतावादी कार्यांस दात्यांनी, देणगीदारांनी व सुस्थितीत असलेल्या नागरिकांनी सढळ हाताने व उदार अंतःकरणाने जीवनावश्यक वस्तूरूपाने किंवा ऑनलाइन सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहण बहुजन संग्राम चे महाराष्ट्रप्रदेश व वृत्तदर्शन मीडियाचे संपादक भीमराव चिलगावकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments