नग्नता हा गुन्हा असल्यास सर्व नागा बाबांना अटक केली पाहिजे

नग्नता हा गुन्हा असल्यास सर्व नागा बाबांना अटक केली पाहिजे - पूजा बेदीमुंबई
गोव्यातील चापोली धरणावर अश्लील व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी अभिनेत्री पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना  पोलिसांनी अटक केली होती. नंतर त्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तसेच, अज्ञात व्यक्तींविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 294 ((अश्लीलता) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेते मिलिंद सोमण यांनी त्यांच्या वाढदिवसाला गोव्याच्या किनाऱ्यावर धावतानाचा एक नग्न फोटो सोशल मीडियावर शेअर केला. अगदी काही वेळातच हा फोटो व्हायरल झाला. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देत वादंग निर्माण केला. मिलिंद आणि त्यांची पत्नी अंकिता कोंवर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात आली. या सगळ्यात अभिनेत्री पूजा बेदी हिने मिलिंदचं समर्थन केलं आहे. 


दक्षिण गोव्याच्या बीचवर नग्न धावणाऱ्या मिलिंद सोमण यांच्या या फोटोत काहीच अश्लिल नसल्याचं पूजा बेदी म्हणाली. तसंच यात कोणतीही अश्लीलता नसून कलात्मकता असल्याचंही तिने स्पष्ट केलं. ट्विटरवर आपलं मत मांडताना तिने लिहिले की, 'मिलिंद सोमणच्या या कलात्मक फोटोत कोणतीही अश्लिलता नाही. अश्लीलता पाहणाऱ्याच्या मनात असते. त्याचा गुन्हा इतकाच आहे की तो गुड लुकिंग, फेमस आणि नवनवीन बेन्चमार्क सेट करत आहे. नग्नता हा गुन्हा असल्यास सर्व नागा बाबांना अटक केली पाहिजे. फक्त शरीरावर राख लावली म्हणून याचा स्वीकार केला जाऊ शकत नाही.'


मिलिंद यांचा नग्न फोटो शेअर झाल्यानंतर त्यांच्याविरूद्ध अश्लीलता पसरवल्याबद्दल दक्षिण गोवा जिल्ह्यातील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विषयावर मिलिंदची पत्नी अंकिता कोंवर यांनी बॉम्बे टाइम्सला सांगितलं की मिलिंद यांनी विचार न करता हे केलं. या फोटोतून लोकांना सकारात्मक संदेश देण्याचाच त्यांचा मुख्य हेतू होता.


मिलिंद सोमण यांनी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर न्यूड होऊन पळतानाचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता. सोमण यांच्या याच फोटोशूटवर गोवा सुरक्षा मंचने आक्षेप नोंदवत त्यांच्याविरोधात तक्रार नोंंदवली आहे. मिलिंद सोमण 4 नोव्हेंबरला आपल्या पत्नीसोबत गोव्यात गेले होते. त्यावेळी मिलिंद यांनी समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केला. तसेच स्वत:चा न्यूड फोटो आपल्या इन्टाग्राम अकाऊंटर पोस्ट करत फोटोला ‘हॅपी बर्थडे टू मी’ असं कॅप्शन दिलं. त्यानंतर मिलींद यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.


या फोटोवर गोव्यातील स्थानिक राजकीय पक्ष गोवा सुरक्षा मंचने आक्षेप नोंदवला आहे. या पक्षाने मिलिंद सोमण यांच्याविरोधात वास्को पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी गोवा सुरक्षा मंचने ‘सोमण यांनी न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यामुळे गोव्याची प्रतिमा आणि संस्कृतीचा अपमान होत असल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे  सोमण यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी अभिनेत्री पूनम पांडे विरोधातही गोव्याच्या समुद्र किनारी आक्षेपार्ह व्हिडीओचे चित्रण केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. पूनम पांडे आणि तिचा नवरा सॅम बॉम्बे यांना कॅनकोना येथून गुरुवारी ( 5 नोव्हेंबर) अटक करण्यात आली होती.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA