वेबिनार पद्धत रद्द करून स्थायीसभा आणि महासभा पूर्ववत घ्या  - नगरसेवक कृष्णा पाटील

वेबिनार पद्धत रद्द करून स्थायीसभा आणि महासभा पूर्ववत घ्या  

ठाणे महानगरपालिका स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक कृष्णा पाटील यांची मागणी

 


 

ठाणे
ठाणे महापालिकेच्या कारभारातील अनियमितता घडवून घडविलेले भ्रष्टाचार उघड होवू नयेत आणि कोरोनाच्या काळात झालेले भ्रष्टाचार कोरोना संसर्गच्या नावाखाली लपविता यावेत यासाठी स्थायी समिती सभा अद्यापही पूर्वीप्रमाणे सभागृहात घेतली जात नाही. या संदर्भात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना पत्र लिहून आगामी स्थायी समिती सभा सभागृहात घेण्याची मागणी केली आहे. येणारी माहे नोव्हेंबर 2020 ची स्थायी समिती सभा आणि महासभा वेबिनार पद्धत रद्द करून पूर्ववत सबंधित सभागृहात नाही घेतल्यास सबंधित पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येईल आणि वेबिनारवर होणाऱया सभेच्या कामकाजावर (पाणी, आरोग्य, स्वच्छता सारख्या अत्यावश्यक सेवा आणि त्यांचे कामकाज वगळून इतर बाबत) आमची हरकत असेल याची नोंद घ्यावी असे पत्राद्वारे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे.  


वारंवार मागणी करून देखील पालिका सभा घेण्यास अनुकूल नसल्याचे वास्तव उघड झाल्याने कृष्णा पाटील यांनी या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे ठाणे महापालिकेच्या आतापर्यंतच्या सर्व सभा, बैठका, मीटिंग वेबिनारवर घेण्यात आलेल्या आहेत. आता विधानसभा अधिवेशन, संसदेचे अधिवेशन आणि शासनाचे विविध कार्यक्रम पण सभागृहात होत आहेत. तसेच बाजारपेठा, कार्यालये, मॉल, स्वीमिंग पूल, व्यायामशाळा देखील लोकांसाठी पूर्ण क्षमतेने खुले केलेल्या आहेत, शिवाय सिनेमागृह खुली करण्याची परवानगी देखील दिलेली आहे.

 

बेस्ट बसेस आणि एसटीच्या बसेस पूर्ण प्रवाशी क्षमतेने वाहतूक करतात, रेल्वे लोकलमध्ये पण पूर्वीप्रमाणेच गर्दी असते. मग प्रवाशांना, नागरिकांना, आमदार, खासदार यांना कोरोना संसर्ग होत नाही. पण ठाणे महापालिकेची विविध प्रशस्त सभागृहे असतानाही महापालिकेच्या विविध सभा आणि मीटिंग आयोजित करताना कोरोना लागण नगरसेवक आणि महापालिका अधिकारी यांना कशी होवू शकते?  `मिशन बिगिन अगेन' राबविताना सर्व ठिकाणी वावरमुक्त केलेला असताना ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभा आणि महासभा वेबिनार पद्धत रद्द करून पूर्ववत सबंधित सभागृहात घेण्यासाठी प्रशासनाला आणि राज्य शासनाला कोणती भिती वाटते?  असे काही सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या