ठाण्यात इलेक्ट्रीक बस चालविण्याबाबत एमएमआरडीएचे आयुक्त राजीव अनुकूल
ठाणे
ठाणे शहरातील प्रदूषणावर मात करण्यासाठी टीएमटीच्या इलेक्ट्रीक बस गाड्या चालविण्यात याव्यात, अशी मागणी ठामपा परिवहन समिती सदस्य शमीम खान यांनी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एमएमआरडीएचे आयुक्त ए. आर. राजीव यांना सूचना केल्यानंतर त्यांनी या संदर्भात निधी उपलब्ध करुन देण्यास अनुकूलता दर्शविली आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात गेल्या अनेक दिवसांपासून वाहनांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. वाहने वाढत असल्याने प्रदूषणही वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक बसगाड्या या मोठा पर्याय आहे.
या बसगाड्या ठाणे शहरात धावल्यास प्रवासखर्चातही कपात होऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन 50 इलेक्ट्रॉनिक गाड्या ठाणे परिवहन सेवेसाठी उपलब्ध करुन द्याव्यात, मागणी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा- मुंब्रा विधानसभा क्षेत्रअध्यक्ष तथा परिवहन सदस्य शमीम खान यांनी होती. याच अनुषंगाने मंगळवारी शमीम खान यांनी डॉ. आव्हाड यांची मंत्रालयामध्ये भेट घेतली. यावेळी परिवहन व्यवस्थापक किशोर गावित, परिवहन सदस्य प्रकाश पाटील आणि मोहसीन शेखदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर डॉ. आव्हाड यांनी एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांच्याशी संपर्क साधून निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर शमीम खान आणि शोएब खान यांनी राजीव यांची भेट घेऊन या संदर्भातील भुमिका विषद केली. त्यावर राजीव यांनी या मागणीची अंमलबजावणी करणेबाबत अनुकूलता दर्शवून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शमीम खान यांना दिले.
0 टिप्पण्या