बांगलादेशची अर्थव्यवस्था भारताच्या पुढे

नवी दिल्ली
काळ्या पैशाविरोधात कारवाईची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नोटाबंदीची घोषणा केली. याला चार वर्षाचा कालावधी झाला आहे.  नोटाबंदीला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि भारतीय अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीबाबतही सांगितलं. राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ‘नोटाबंदी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारपूर्वक उचललेलं एक पाऊल होतं. जेणेकरून सामान्य जनतेच्या पैशांनी मोंदींचे मित्र उद्योगपती यांची लोखो कोट्यवधी रूपयांची कर्ज माफ केली जावी.

तर नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळ्या पैशाचे प्रमाण कमी झाले, कररचना, करभरणा या गोष्टींना मोठा फायदा झाला तसेच कारभार अधिक पारदर्शक होण्यास मदत झाली असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. नोटाबंदीमुळे ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्यांचा देशाला मोठा फायदा झाला आहे. नोटाबंदीने कररचना व जीएसटी यांच्यात सुधारणा होण्यास खूप मोठी मदत झाली, करभरणा वेळेवर होण्याचे प्रमाण वाढले. भारताच्या अर्थव्यवस्थेतील रोखतेचे प्रमाण कमी झाले. असे मत प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केले.

नोटबंदीचा निषेध म्हणून काँग्रेसने देशभरात ‘विश्वासघात दिवस’ पाळला.   हे चुकून झालं आहे असं समजू नका, हे जाणूनबुजून करण्यात आलं आहे. हा राष्ट्रीय त्रासाच्या चार वर्षांसाठी तुम्हीही आवाज उठवला पाहिजे,’ असंही राहुल गांधी म्हणाले. आज भारतासमोर मोठं संकट आहे. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. प्रश्न हा आहे की बांगलादेशची अर्थव्यवस्था भारताच्या पुढे कशी गेली. एक अशी वेळ होती जेव्हा भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वोत्तम अर्थव्यवस्था होती. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याचं कारण कोरोना असल्याचं सरकारकडून सांगितलं जातं. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव बांगलादेशमध्येही आहे. इतर देशांमध्येही आहे. मग भारतच यात मागे कसा राहिला? असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

याबाबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान मोदींवर नोटबंदीवरून निशाणा साधला. नोटबंदीचा देशावर काय परिणाम झाला, हे मोदींनी कागदोपत्री सांगावे, असे ते म्हणाले नोटबंदीचा मागील चार वर्षात काय परिणाम झाला हे मोदींनी कागदोपत्री सांगावे. केंद्र सरकारने ती चूक आतातरी दुरुस्त करावी. मग ती चूक वस्तू सेवा करातील, कोरोना काळातील निर्णय किंवा नोटबंदीचा निर्णय असेल, असे गेहलोत म्हणाले. काळा पैसा मोठ्या प्रमाणात साठवला जात आहे. ‘ इल्ट्रोल बाँड’ हा मोठा घोटाळा असून लोकशाहीसाठी घातक आहे. या बाँडद्वारे कोणती कंपनी कोणत्या राजकीय पक्षाला किती पैसे पुरवत आहे, हे समजून येत नाही, असे ते म्हणाले.ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळली -नोटबंदीच्या चार वर्षांनंतर देशातील शेतकरी, कामगार आणि व्यापारी पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. खुद्ध रिजर्व बँक ऑफ इंडियाने सांगितले की, नोटबंदीनंतर ९९.३ टक्के पैसे माघारी आले आहेत. डिजियाटझेनही महत्त्वाचे आहे. मात्र, अर्थव्यवस्था पुन्हा कशी उभी करावी, हा मुख्य मुद्दा आहे.

काळ्या पैशांवर अभूतपूर्व हल्ला करणारं पाऊल उचलल्याने चांगलं कर नियोजन आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली.  ‘नोटाबंदीनंतर पहिल्या चार महिन्यांत ९०० कोटी रुपयांची अघोषीत मिळकत जप्त करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या तीन वर्षात ३,९५० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. सर्वेक्षणानंतर अनेक कोटी रुपयांची अघोषीत मिळकतीचा खुलासा झाला. ऑपरेशन क्लीन मनीमुळे अर्थव्यवस्था औपचारिक बनवण्यास मदत झाली.’  ‘नोटाबंदीने केवळ पारदर्शकताच आणली नाही तर कराचा परीघ वाढवला. तसेच यामुळे बनवाट चलनावरही अंकुश मिळवता आला.’ अशी प्रतिक्रिया ट्वीटद्वारे सितारमन यांनी दिली.

दरम्यान , नोटबंदी केली. त्यानंतर कुणाचा काळा पैसा भारतात आणला.. कुठला पैसा आणला.. कधी आणला.. कसला खुलासा केला.. काही लोकांचा रांगेत उभं रााहून जीव गेला त्याचं काय केलं.. असे प्रश्न विचारत.. झालं इतकंच की अंबानी आणि अदानी भरभरून भरले आणि बापू कलरफुल झाले. असं ट्वीट  अभिनेता, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव याने केले आहे. यामुळे चर्चेला अधिकच रंग चढला आहे. 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या