Top Post Ad

आदिवासीं सोबत दिवाळी साजरी 



आदिवासीं सोबत दिवाळी साजरी 

आदिवासीं मध्ये आनंदाचे वातावरण. 

 

उरण 

 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान व शिव प्रतिष्ठाण ग्रुप उरण,छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली-उरण यांच्या संयुक्त विद्यमाने  कल्ले वाडी (पनवेल) येथे आदिवासी वाडी वस्त्यांवर  दीपावली निमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम मोठया   उत्साहात संपन्न झाला.यावेळी वाडी वस्ती मध्ये असलेल्या प्रत्येक घरात जाऊन आदिवासींना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. अनेक समस्यांनी ग्रस्त व समाजापासून दूर डोंगरात, जंगलात अतिशय बिकट परिस्थितीत जगणाऱ्या आदिवासीं मध्ये फराळ वाटपाच्या कार्यक्रमामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 

 


 सुदेश पाटिल, हेमंत पवार, समीर पाटील, सुरज पवार , आकाश पवार, प्रेम म्हाञे, ओमकार म्हात्रे, सुविध म्हाञे, शुभम ठाकुर,संजोग पाटील, नितेश पवार, सागर म्हाञे, गणेश म्हात्रे, अनुदिप पवार, मोहित र्वतक, प्रणय पाटील, प्रणय ठाकुर, साहिल म्हात्रे, सुरज केळवने, प्रकाश म्हात्रे, मोहित गावंड, आर्यन पाटील, भाविक पाटील, अर्णव पाटील आदी शिवभक्त ,  संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी या सामाजिक कार्यात सहभाग घेतला.सामाजिक बांधिलकि जपत गोरगरिबांसोबत दरवर्षी दिवाळी साजरा करण्यात येते अश्या सामाजिक उपक्रमातून आदिवासी समाजातील व्यक्तींच्या सुख दुःखात सहभागी होता येते.त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न व समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामील करून घेण्यासाठी असे उपक्रम संघटनेमार्फत नेहमी राबविले जातात अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान व शिवप्रतिष्ठानचे उरण तालुकाध्यक्ष सुदेश पाटील यांनी दिली.


---------------------------------------------

 





सक्सेस फॉउंडेशन व एन्जॉय ग्रुपची दिवाळी आदिवासीं सोबत. 

ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत सक्सेस फाऊंडेशन व एन्जॉय ग्रुप  तर्फे चिरनेर येथील माकडडोरा आदिवासी वाडीवर दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी सुरज भगत, निलेश ठाकूर, रुपेश पाटील, आनंद म्हात्रे,भेंडखळ गावचे सामाजिक कार्यकर्ते अनिल ठाकूर, अनिल भोईर व संपूर्ण टीम उपस्थित होती. आदिवासी वाडीवरील सर्व आदिवासी आपले सर्व दुःख विसरून या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे आदिवासी व्यक्तींच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते.


------------------------------------





कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाची आदिवासीं सोबत दिवाळी साजरी 

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय उरण तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अधिवासी बांधवां सोबत अक्कादेवी कातकरी वाडी येथे दिवाळी साजरी करण्यात आली.  कार्यक्रमात उरण तालुक्यातील आदिवासी वाडी वस्तीतील  ५१ महिलांना सहावारी साडी , १८ महिलांना बारावरी साडी, ७० पुरुषांना टॉवेल व ७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्राचार्य के.अे.शामा सर व कार्यक्रमाचे नियोजन अनिल पवार, डॉ. डि.पी.हिंगमिरे,  विशाल पाटेकर यांनी केले.  याप्रसंगी रोहित नितीन पाटील,  ती.एन.घ्यार सर   , प्रा.डॉ. एम.जी. लोणे  , प्रा.डॉ.पी.आर.करुळकर,  रियाझ पठाण सर, निकेतन किशोर शामा, तेजस आठवले, आचल शिंदे,  मंगेश म्हात्रे, अतुल ठाकूर (नगरसेवक), शैलेश गावंड, नितेश शिंदे, सनी पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते .


-------------------------------------------------

 





स्टेपआर्ट कला, क्रिडा, शैक्षणिक व सामाजिक संस्था, उरण तर्फे
आदिवासी व वीट भट्टी कामगार महिलांना दिवाळी निमित्त साडी व खाऊ वाटप.

        एक दीपावली, आदिवासी महिलांसाठी या संकल्पनेतून स्टेप आर्ट सामाजिक संस्थेने साई, दिघाटी व चिरनेर परिसरातील वीट भट्टी कामगारांच्या वस्तीवर जाऊन 95 कुटुंबांना नवीन साडीचे आणि खाऊचे वाटप करून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला, हे सामाजिक कार्य करत असताना त्या माय-भगिनींच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरील सुहास्य पाहून खऱ्या अर्थाने यावर्षी दिवाळीचा आनंद मिळाला तो आजपर्यंत कधीच मिळाला नव्हता असे मनोगत स्टेप आर्ट कला क्रीडा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पप्पू सूर्यराव यांनी व्यक्त केले.     कोरोना च्या पार्श्वभूमीवर यापूर्वीही तालुक्यातील विविध झोपडपट्टी भागात जवळपास 800 हुन अधिक गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. अश्याच  गरीब व गरजूंना मदत करून दिवाळी साजरी करण्याचा संस्थेचा संकल्प आज पूर्णत्वास आला असल्याने संस्थेच्या प्रत्येक पदाधिकारी आणि सदस्यांना समाधान वाटले.

      साडी आणि खाऊ वाटप करण्यास अध्यक्ष पप्पू सूर्यराव यांच्या समवेत संस्थेचे खजिनदार देवेंद्र पाटील, संस्थेचे सल्लागार तथा सुप्रसिद्ध निवेदक नितेश पंडित,तसेच सुशांत पाटील, अतिष पाटील, गणेश गावंड, गणेश म्हात्रे,पंकज जाधव, रेश्मा साळुंखे, सोनाली सूर्यराव, रुपाली खरात, प्राची कोळी, जिज्ञासा पाटील, भाग्यश्री ठाकूर आणि पियुष पाटील इत्यादी सदस्य उपस्थित होते. दीपावली उत्सव संपूर्ण भारतात साजरा होत असला तरी प्रत्येकाच्या घरी दिवाळीचा दिवा पेटतोच असे नाही, प्रत्येकाला नविन कपडे, गोडधोड, स्वादिष्ट खाऊ मिळतोच असेही नाही...याच अनुषंगाने हा संकल्प हाती घेऊन संस्थेने पूर्ण केल्याने समाजातील विविध स्तरातून संस्थेच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

 


 

 





 



 

 


 




 

 


 


 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com