ठामपाचे कार्यकारी अभियंता रविंद्र शिंदे यांनी केली नालेबांधणीची पाहणी 

ठामपाचे कार्यकारी अभियंता रविंद्र शिंदे यांनी केली नालेबांधणीची पाहणी 

आयुक्तांना दिला ठाणे नालेबांधणी प्रकल्प अहवाल

 


 

ठाणे

ठाण्यातील नालेबांधणीबाबत ठाणे महानगर पालिकेचे कार्यकारी अभियंता रविंद्र शिंदे यांनी ६ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील नालेबांधणी कामाची पाहणी केली.  कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अर्थवट राहिलेली नालेबांधणीची कामे करण्याबाबत त्यांनी संबंधितांना आदेश दिले. तसेच लवकरच ही नालेबांधणी करण्यात येईल असे आश्वासन येथील स्थानिक नागरिकांना दिले. 

स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड (गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य)  आणि  नगरसेवक यांच्या सूचनेनुसार नाले बांधणी प्रकल्प अभियान अंतर्गत  नालेबांधणी करण्यात आली. शिंदे यांनी या कामाचा पाहणी दौरा मुंब्रा प्रभाग समितीमधील नाल्यांच्या पाहणीपासून सुरु केला.. तसेच अनेक नागरिकांच्या तक्रारीही जाणून घेतल्या. अनेक भागातील नाले सफाई अद्यापही रखडलेली आहे. अपुऱ्या नालेबांधणीच्या कामामुळे आजुबाजूला कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. लॉकडाऊनमुळे थांबलेल्या कामांना पुन्हा लवकरच गती देण्यात येईल असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.  याबाबतचा अहवाल शिंदे यांनी ठामपा आयुक्तांना दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad