Trending

6/recent/ticker-posts

जेतवन बुद्धविहार मुंढर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन जल्लोषात संपन्न

जेतवन बुद्धविहार मुंढर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन जल्लोषात संपन्नगुहागर
बौद्धजन सहकारी संघ शाखा क्रमांक २४ मौजे मुंढर ता. गुहागर यांच्या वतीने नियोजित अध्यक्ष आयु. महादेव गमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला, सदर कार्यक्रमास आयु महादेव गमरे यांच्या सह उपाध्यक्ष आयु सुबोध मोहिते यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली, शाखेचे सभासद व चिपळूण पोलीस ठाण्याचे हवालदार आयु प्रदीप गमरे यांच्या हस्ते जयभीम स्तंभाला पुष्पहार अर्पण करण्यात आला व कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव गमरे याच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले,


रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. स्मिता मोहिते व सचिव सौ. अमिषा गमरे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुंबई शाखेचे सरचिटणीस आयु अनिल जाधव यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उमेश जाधव व निलेश गमरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुद्ध पूजापाठ पठण करून धार्मिक विधी पूर्ण करून घेतल्या त्यांनतर निधी जाधव, ईशान जाधव, आराध्या जाधव, सम्यक गमरे, यश गमरे, पार्थ गमरे, सिद्धी गमरे, आकाश गमरे, राज गमरे, रोहन गमरे, सुशांत गमरे, श्रुती मोहिते, सोनाली गमरे या विद्यार्थ्यांनी धम्म प्रबोधन केले, त्यांनतर आयु. अनिल जाधव, आयु. अजित गमरे, प्रा. उमेश जाधव, तेजस मोहिते, अक्षय गमरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यानंतर आभार प्रदर्शन करीत अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कोरोना महामारीच्या शासकीय गाईडलाईन्सचे पालन करीत सदर कार्यक्रम सुयोग्य पद्धतीने पार पडला अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस आयु. अनिल जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीना दिली.Post a Comment

0 Comments