Trending

6/recent/ticker-posts

देश तोडण्याचा प्रयत्न होत आहेत, महाराष्ट्रात द्वेष पसरवला जातोय त्यामुळे सावध रहा- उद्धव ठाकरे

  देश तोडण्याचा प्रयत्न होत आहेत, महाराष्ट्रात द्वेष पसरवला जातोय त्यामुळे सावध रहा- उद्धव ठाकरेपाकव्याप्त हे जर देशात असेल तर पीएम यांचे पाप, आमचे पाप नाही. एकाने आत्महत्या केल्यानंतर बिहार पूत्र गेला म्हणून गळे काढले जात आहेत. गळे काढणारे महाराष्ट्र सरकार, ठाकरे कुटुंबीय, आदित्य यावर आरोप केले, गोमूत्र शेणाने गुळण्या केल्या नंतर काय झालं. महाराष्ट्रात द्वेष पसरवला जोतोय त्यामुळे सावध रहा. देश तोडण्याचा प्रयत्न होत आहेत. भाजपा हा मित्रपक्ष पण इमान नका राखू पण किमान मातीशी इमान राखा. अहंकारी राजा आणि कळसु्त्री बाहुल्यांचा खेळ येथे चालणार नाही. कोरोना संकट असताना केवळ पाडापाडी करून सरकार पाडण्याच काम होत असेल तर अराजक वाटचाल आहे. असे स्पष्ट मत आज  दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. 


शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात केवळ 50 जणांच्या उपस्थितीत सोशल डिस्टस्टिंगचे सर्व नियम पाळत पार पडला. कोरोना संकटामुळे दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा खंडीत झाली असली तरी भाषणातील आक्रमकपणा कायम होता असे जाणकार आपले मत व्यक्त करीत आहेत.  शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हे सरकार लवकरच पडेल असेल म्हणणाऱ्यांवर   निशाणा साधला . महाराष्ट्रात जो डाव खेळला गेला तोच आता बिहारमध्ये खेळला जात आहे असा आरोपही त्यांनी केला. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देणार आहोत. त्याची त्यांनी काळजी करू नये. पण त्यावरून राज्यात फुट पाडण्याचं राजकारण यशस्वी होऊ देऊ नका असं आवाहनही त्यांनी केलं.


'अनेक जण तारीख पे तारीख देतात. अनेक जण सरकार पाडण्याचे स्वप्न बघतात. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ठेपेला चिटकणारे मुंगळे नाही. जर वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो हे दाखवल्या शिवाय दाखवणार नाही. मी वाघाची औलाद आहे, त्याला जर डिवचले तर काय होत असते ते इतिहासात दाखले आहे. ' असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना यावेळी दिला.  दसरा मेळावा टार्गेट करायला नाही. कोरोनाची लस बिहारला मोफत देणार पण काहीना येथे मोफत लस देण्याची गरज असते.  आज मी मास्क बाहेर काढून बोलणार, सीएम म्हणून नाही. त्यामुळे कदाचित संयम सुटला तर समजून घ्या. ज्यांना टक्कर देण्साची खुमखुमी असेल त्यांनी टक्कर द्यावी त्यांना दाखवून देऊ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.


जीएसटीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर निशाणा साधला. जीएसटी करपद्धत ही फसवी आहे.   जीएसटी थकीत रक्कम देत नसाल केंद्र सरकारची ही कर पद्धत फसली आहे, पीएम यांनी त्यात प्रामाणिकपणे सुधारणा करा, अथवा आधीच्या मूळ कर प्रणालीयावर जावे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.   यावेळी राज्यपालांवरही निशाणा साधला आहे. मंदिरे खुली करण्यावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदुत्वावरून डिवचले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर निशाणा साधला आहे. नाव न घेता त्यांनी निशाणा साधला. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.


आपल्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपला टार्गेट केलं. कंगणा राणौतवरही त्यांनी जोरदार टीका केली. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हे पंतप्रधान मोदींचा अपमान आहे असंही ते म्हणाले.
सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्रावर, शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर जे आरोप केले ते महाराष्ट्राला बदनाम करणारं आहे. शेण खाऊन त्यांनी आमच्यावर गोमुत्राच्या गुळण्या केल्या ते सगळ्या जगाने पाहिलं असंही ते म्हणाले.
मुंबई, शिवाजी पार्क सगळीकडे चरस गांजा पिकला अस चित्र काही निर्माण केले, आमच्या घरासमोर तुळशीवृंदावन असते. गांजाची शेती तुमच्याकडे असते.
मुंबई महाराष्ट्र पोलिस दल अभिमान आहे. केवळ महाराष्ट्र पुढे जातो म्हणून बदनाम केले जाते.


गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे सातत्याने ठाकरे सरकारवर टीका करत असतात. यावरुन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राणेंवर निशाणा साधला आहे. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरपुस शब्दात समाचार घेतला. ठाकरे यांनी नारायण राणे यांची तुलना बेडकाशी तुलना केली आहे. पुढे ठाकरे म्हणाले की, 'काही जणांना इंजेक्शन द्यावे लागते. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचे इंजेक्शन द्यावे लागते. काही जण तर अशी बेडूक आहेत. तुम्हा सर्वांना तर माहिती आहे एक बेडूक आणि त्याची दोन पोरे. या पक्षातून त्या पक्षात. बेडकाच्या पिल्लाने बैल पाहिला असे मी लहान असताना गोष्ट ऐकली होती. पण आता बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला आणि ते पळत सुटले. त्यांनी बाबांना सांगितले. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही' अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments