ठाण्यात शनिवारी रत्नाकर मतकरी स्मृतिमालेत रंगणार, लोकवस्तीची अभिव्यक्ती !

ठाण्यात शनिवारी रत्नाकर मतकरी स्मृतिमालेत रंगणार, लोकवस्तीची अभिव्यक्ती !


ठाणे  
ज्येष्ठ साहित्यिक आणि समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत वंचितांचा रंगमंचचे प्रणेते रत्नाकर मतकरी यांना नाट्य जल्लोषची मानवंदना या मालिकेतील चवथ्या मासिक कार्यक्रमात आज रंगणार आहे, लोकवस्तीची अभिव्यक्ती! आज शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वा. झूमच्या माध्यमातून होणारा हा कार्यक्रम रसिकांना समता विचार प्रसारक संस्थेच्या फेसबुक वर लाईव्ह बघता येणार आहे.


लोकवस्तीतील अभिव्यक्ती. या कार्यक्रमात वंचितांचा रंगमंचावरील लोकवस्तीतील महिला आणि युवा सध्यस्थिती बाबत त्यांच्या मनातील विचार मनमोकळे पणाने व्यक्त करणार आहेत. लोकवस्तीची अभिव्यक्ती हा अभिनव उपक्रम म्हणजे घरातील, परिसरातील, शाळेतील, कॅालेजातील, प्रवासातील अनुभव, मनात आलेले विचार, विचारात झालेले बदल, समस्या, भेटलेल्या व्यक्ती, आवडणा-या गोष्टी, स्वत: लिहिलेली कथा किंवा कविता अशा प्रकारच्या कुठल्याही विषयावर लोकवस्तीतील जन सामान्यांनी प्रभावीपणे व्यक्त होणे! मानपाडा, चिराग नगर, कोपरी, कळवा, घणसोली, मनोरमा नगर, सावरकर नगर, खारटन रोड आदी लोकवस्ती मधील चौदा कलाकार, कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी होणार आहेत.


या सर्वांच्या अभिव्यक्तीला दाद देण्यासाठी रंगकर्मी प्रतिभा मतकरी, प्रसिद्ध साहित्यिक नीरजा, सिने - नाट्य कलाकार सुप्रिया विनोद, पंकज विष्णू, नाट्य दिग्दर्शक मिलिंद अधिकारी, लेखक अरविंद औंधे, पत्रकार मीना कर्णिक, राज असरोंडकर, मुक्ता श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थेचे विश्वस्त डॉ. संजय मंगला गोपाळ असणार आहेत.


कार्यक्रमात रत्नाकर मतकरी यांच्या "श्रद्धेला डोळे असतात?" या ललित लेखाचे शेवटी अभिवाचन - प्रसिद्ध कलाकार पंकज विष्णू करणार असून कार्यक्रमाचे सूत्र संचालन ज्येष्ठ दिग्दर्शक - लेखिका हर्षदा बोरकर करणार आहेत, अशी माहिती समता विचार प्रसारक संस्थेच्या सचिव हर्षलता कदम आणि मतकरी स्मृती मालेच्या सह संयोजक मीनल उत्तूरकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. दर महिन्याच्या १७ तारखेला, लोकवस्तीतील एकलव्य विद्यार्थ्यांच्या प्रमुख सहभागातून या मालेत विविध कला - विचार दर्शन घडविण्यात येते. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फेसबुक लाईव्ह : https://www.facebook.com/samatavicharprasaraksanstha 
अधिक माहितीसाठी संपर्क: ८१०८९४९१०२.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA