हाथरस उत्तर प्रदेश गँगरेप, हत्याकांडाचा जाहीर निषेध निदर्शने

हाथरस उत्तर प्रदेश गँगरेप, हत्याकांडाचा जाहीर निषेध निदर्शने        हाथरस उत्तर प्रदेश येथे शेड्यूल कास्ट मुलीवर झालेल्या निर्घृण अत्याचाराचा निषेध डॉ. बी. आर. आंबेडकर नॅशनल एस.सी  एस. टी फेडरेशन, फुले-आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन (फासा) आणि ऑल इंडिया बुद्धिस्ट कौन्सिल यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध निदर्शने करण्यात आली. तसेच मा.जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मा.राष्ट्रपती आणि मा.पंतप्रधान यांना निवेदने देण्यात आली . शेड्युल कास्ट आणि अल्पसंख्यांक घटकांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत त्या संदर्भात पुढील निवेदन सादर केले.  या प्रसंगी डॉ. इंदिरा आठवले, डॉ. नितीन गांगुर्डे, बि. जी .वाघ,कैलास चव्हाण, दादाजी बागूल, प्रा. डॉ  बावीस्कर, सचिन घागरमाळे, प्रा. सुनील कनकटे , मैना म्हस्के , ऍड.संगीता गायकवाड, मनीषा डोंगरे, शशिकांत खडताळे,वैशाली बागुल  सह अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.


       मनीषा वाल्मीकी या शेड्यूल कास्ट मुलीवर निर्घृण अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. तसेच उत्तर प्रदेशातील बलरामपूर आणि आझमगड  येथे सुद्धा अशाच अत्याचाराच्या घटना  घडल्या  त्याचा  आम्ही निषेध करतो. 
पुढील मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या.  1) अत्याचार करणाऱ्या रेपिस्ट गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. 
2)गुन्हेगारांना अभय देणार्‍या आणि मुद्दामच चुकीचे गुन्हे दाखल करणार्‍या अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. 
3)पीडितांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी.  शेड्यूल कास्ट पीडित मुलींच्या कुटूंबांना न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad