ही तर परमेश्वराची इच्छा - देवेंद्र फडणवीस

आपण विश्रांती घ्यावी अशी ईश्वराची इच्छा - देवेंद्र फडणवीसमुंबई :
भाजपाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री, तसेच बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस  यांनी सतत काम करत राहील्याने आपण विश्रांती घ्यावी अशी ईश्वराची इच्छा असावी म्हणून कोरोनाची लागण झाल्याचे अजब तर्कट मांडले. त्यामुळे सोशल मिडीयावर चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सत्यनारायण यांनी ईश्वराच्या करणीमुळे देशात कोरोनाची साथ असल्याचे अजब तर्कट मांडले. त्याचधर्तीवर आता फडणवीस यांचे वक्तव्य आले आहे.  कोरोनाची लागण झाली की बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजायला मार्ग नाही.


बिहार निवडणूकीच्या जाहीर होण्याआधीपासून ते सातत्याने बिहारला जावून परत मुंबईला येत आहेत. त्यातच त्यांच्यावर निवडणूकीच्या निमित्ताने त्यांच्यावर बिहारची जबाबदारी भाजपाने सोपविल्याने त्यांचा बहुतांष वेळ बिहारमध्येच जात आहे. तेथे आधीच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत पुरेशी जनजागृती नाही. तसेच तेथील वैद्यकीय सुविधाही चांगल्या प्रतीच्या नसल्याने बिहारमधील जनता आधीच रामभरोसे आहे. त्यात आता देवेंद्र फडणवीस हे ही कोरोनाच्या अनुषंगाने पुरेशी काळजी घेताना दिसत नाहीत. यासंदर्भात त्यांचे काही फोटो व्हायरल झाले त्यात त्यांच्या सोबत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी मास्कच परिधान केले नसल्याचे आल्याचे वारंवार दिसून आले. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करावी आणि विलगीकरणात रहावे असे आवाहनही फडणवीस यांनी केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या