Top Post Ad

तो समाज कधीच सत्तेत येण्याची शक्यता नाही

ज्या समाजात इतके गट आहेत तो समाज कधिच सत्तेत येण्याची शक्यता नाही.  सत्तेत न येण्याच कारण गांभिर्याने विचार करण्याची गरज.... उठ सूठ सोशल मिडीयावर टिका टिप्पणी करण्याने काय साध्य होणार..... आपल्या घरातील लाकडं संपली आहेत.... आता घर पेटण्याची वेळ आली आहे..... तरीही कंगना आणि सुशांतच्या पोस्टवर शेरेबाजी करणाऱ्यांना काय म्हणायचं....... या व्यवस्थेला हेच अपेक्षित आहे.... तुम्ही कुठे तरी गुंतून रहायचं आणि त्यांनी आपला कार्यभाग साध्य करायचा... आजही जातीव्यवस्थेचे अनेक बळी जात आहेत. आज शिक्षण हातातून गेलं आहे.... नोकऱ्या गेल्या आहेत.... रोजगारीच्या विवंचनेत सर्वसामान्य गंटांगळ्या खात आहेत... यावर आपण काहीच करू शकत नाही... आपण केवळ आपल्याच लोकांना हसत राहू आणि शेरेबाजी करत राहू यातच आम्ही मोठेपणा समजतो....

1) भारिप-बहुजन महासंघ  (वंचित बहुजन आघाड़ी)
2) डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी
3) बहुजन समाज पार्टी
4) आजाद समाज पार्टी
5) आंबेडकरवादी रिपब्लीकन पार्टी
6) आंबेडकरी पार्टी ऑफ इंडिया
7) डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया
8) डेमोक्रेटीक सेक्युलर पार्टी
9) नवभारत डेमोक्रेटीक पार्टी
10) नवबहुजन समाजपरिवर्तन पार्टी
11) पिपल्स रिपब्लीकन पार्टी (कवाडे)
12) पँथरस रिपब्लीकन पार्टी
13) प्रबुध्दा रिपब्लीकन पार्टी
14) प्रबुध्दा भारत प्रजासत्ताक पार्टी
15) बहुजन महासंघ पक्ष
16) बहुजन रिपब्लीकन एकता पक्ष
17) बहुजन रिपब्लीकन सोशालिष्ट पार्टी
18) बहुजन विकास आघाडी
19) भारतीय बहुजन क्रांती दल
20) भारतीय रिपब्लीकन पक्ष
21) रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉर्मिस्ट)
22) रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल)
23) रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे)
24) रिपब्लीकन प्रेसिडीयम पार्टी ऑफ इंडिया
25) रिपब्लीकन बहुजन सेना
26) रिपब्लीकन सेना
27) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)
28) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)
29) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोरीपा)
30) रिपब्लिकन जनशक्ति पक्ष
31) पी पी आई
32) स्वाभीमानी रिपब्लीकन पक्ष (मनोज ससारे)
33) बहुजन वॉलिंटीयर फोर्स
34) अ.भा. रेव्होल्युशनरी शोषित समाजसंघ,लातूर
35) बहुजन मुक्ती पार्टी
36) ब्लॅंक पॅंथर
37) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)
38) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (दिलीप गायकवाड )
39) युथ रिपब्लिकन ( भाई संगारे )
40) संविधानवादी रिपब्लिकन पक्ष
41) भारतीय दलीत कोब्रा
42) भीम टायगर युवा सेना...
.43 भीमसेना
44 भीम टाइगर सेना
45 भीम आर्मी

46 बामसेफ सहित ऑफ सूट विंग अन्य 55 ( राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय अध्यक्ष वामन मेशराम )
47 बामसेफ विभिन्न गुट
48 मूलनिवासी संगठन विभिन्न गुट
49 भारतीय बौध्द महासभा
राष्ट्रीय अध्यक्ष :- 
1 मीरा ताई अम्बेडकर
2 राजरत्न अम्बेडकर
3 चंदू पाटिल

50 समता सैनिक दल--- विभिन्न राष्ट्रीय अध्यक्ष
51 एम्बस ( विजय मानकर )
52 अम्बेडक्राइड पार्टी आप इंडिया ( विजय मानकर )

 ज्या समाजात इतके गट आहेत तो समाज कधीच सत्तेत येऊ शकत नाही ..!
तर तुम्हीच विचार करा व जो निर्णय तुम्हाला योग्य वाटेल ते करा ... आपण फक्त सत्तेचे स्वप्न बघु शकतो सत्तेत येऊ शकत नाही . यातले काही पक्ष तर फक्त आपल्याच लोकांवर टीका टिप्पणी साठी बनलेत ..चार पैसे घेऊन थोबाड उघडतात...समजून घ्या आपली लढाई बाहेरच्यांशी नसून आपापल्या मधीच लागलीय ..येत्या काही वर्षात अजून १०-१२ गट उदयास येतील .. त्यांच्या ही वापर प्रस्थापित पक्ष आपल्याच लोकांवर टीका टिप्पणी करण्यासाठी करतील...  बाबासाहेब म्हणाले होते शासनकर्ती जमात बना पण आपली जमात आपल्यातच लढतेय हे दुर्दैव😑 आपण आपल्यातच आपल्याच समाजातील जागेसाठी भांडतो आहे का ?  आपली  लढाई  कोणाशी? प्रस्थापित पक्षांशी की आपल्याच गटांशी?  आपल्याच गटातटाचा फायदा नेमका कोणाला?

---------------------

ज्याच्या पाठी कुत्रं नाही तो कंगनाच्या पाठीशी...!

याला कंगनाचं नाव पण नीट माहीत नाही...म्हणे कंगना रावण...अन चाललाय तिला संरक्षण द्यायला... काल परवा पर्यंत शिवसेनेची चाकरी करत होता तेंव्हा कधी नाही कळलं की मुंबई सर्वांची आहे...अमराठी मजुरांना,  फेरीवाल्यांना बेलगाम राज ठाकरे तुडवीत होता तेंव्हा त्या गरिबांसाठी अवाक्षर काढायची डेअरिंग नव्हती अन आज एका टीनपाट छाप नटीला संरक्षण द्यायला निघालाय...  जिच्या प्रोटेक्शन साठी देशाच्या गृहमंत्र्यांनी ऑलरेडी मांडी थोपटलीय तिला संरक्षण द्यायच्या फालतू गप्पा हासडण्याऐवजी काल परवाच घडलेल्या 'नगर' अन 'जालनाच्या' अत्याचार पिडीत दलितांच्या संरक्षणाबाबत जीभ चालवली असती तर...

नाही...त्याची आता गरज उरली नाही...कारण अशा हत्याकांडांची गरज फक्त अन फक्त राजकारणात एंट्री घेण्यापुरती असते...नंतर सेट व्हायला मालकाची बुडचाटेगीरी बस्स ...अशा बुड चाटेगीरीतुनच तर मुंबईच्या पॉश वस्तीत बस्तान बांधलय ना... या चाटेगीरीच्या नादात मग त्या टीनपाटछाप नटीनं मुंबईला पाकिस्तान म्हटलंय याचंही भान नाही राहिलं याला... त्या नटीच्या सरंक्षणासाठी याच्या कार्यकर्त्यानी  शिवसेनेच्या सैनिकांशी एअरपोर्टवर पंगा घेतला म्हणे... धर्मांध बाळ ठाकरे जेंव्हा उठसूठ ओपनली बाबासाहेबांची निंदा-नालस्ती करत होता त्यावेळी मात्र शिवसेनेशी असा पंगा घ्यायची मर्दुमकी नाही दाखवता आली..  काय तर म्हणे कंगनाला संवैधानिक अधिकार आहे अन त्याची रक्षा करायचीय...भाजपा पिडीत अनेक महिला आहेत त्यांना देखील संवैधानिक हक्क असतील नाही का ? केवळ सत्तेत राहण्यासाठी मालकानं 'छु' म्हटलं की लाफटावाणी सुसाट सुटायचं..किती ' इमानी लाचारी ' ही.....

मिलिंद भवार - पँथर्स

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com