आर्थिकदृष्ट्या कमकुवत व स्थलांतरीत कामगारांना मिळणार अर्थिक सहाय्य
ठाणे
आर्थिक दृष्ट्या कमकुवत आणि बँकांच्या परिघाबाहेर असणाऱ्या लोकांना कर्ज व पतपुरवठा करण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांनी केले आहे. या आवाहनाला अनुसरून वित्तीय संस्था व्हीएन फायनान्सने ‘श्रमिक लोन’ आणि ‘रोजगार लोन’ देण्याची योजना आखली आहे. याबाबत माहिती देताना व्हीएन फायनान्सचे संचालक आणि संस्थापक मोहित कक्कड म्हणाले,की “सुलभ आणि लवकरात लवकर वित्तपुरवठा करून गरजू लोकांना त्यांची स्वप्ने साकार करण्यास मदत करून समाजात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगर (एमएमआर) क्षेत्रात आक्रमकपणे विस्तारण्याचे आणि टप्प्याटप्प्याने भारतभर विस्तारण्याचे आमचे नियोजन आहे.”

व्हीएन फायनान्सकडून बँकिंग मध्यस्थ, स्वयंसहाय्य बचत गट (एसएचजी), गैरसरकारी स्वयंसेवी संस्था (एनजीओ) आणि व्यापार प्रतिनिधींचे जाळे विकसित केले जात असून, ते स्थलांतरित मजूर, बँकांकडून दुर्लक्षित आणि आर्थिकदृष्ट्या वंचित स्त्री-पुरुषांपर्यत पोहचून त्यांना कर्ज वितरणास मदत करतील असेही त्यांनी सांगितले. कोविड-१९ च्या कहराने देशातील लाखो लोकांना संकटाचा सामना करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर २४X७ अहोरात्र अखंड सेवेसह, किमान दस्तऐवजांच्या माध्यमातून आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून संवाद साधून एका दिवसात कर्ज वितरणाने या लोकांना दिलासा देण्याचा व्हीएन फायनान्सचा दृष्टिकोन आहे. ही कर्जे २५,००० रुपये इतक्या अल्प रकमेपासून सुरू होणारी आहेत.
0 टिप्पण्या