*वर्क फ्रॉम माय ऑफिस*' आमदार क्षितीज ठाकूर यांचा अनोखा उपक्रम

*वर्क फ्रॉम माय ऑफिस*'


वसई

तुमच्या घराचं घरपण परत मिळवून देण्यासाठी आमदार क्षितीज ठाकूर बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून 'वर्क फ्रॉम माय ऑफिस' ही संकल्पना घेऊन आले आहेत. वसई-विरार पट्ट्यात राहणाऱ्या आणि घरून काम करणाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम माय ऑफिस' ही संकल्पना प्रचंड फायद्याची ठरली आहे.  दोन दिवसाच्या कालावधीत या उपक्रमाला हजारो लोकांनी प्रतिसाद दिला असून अद्यापही नोंदणी सुरु असल्याचे आमदार ठाकूर यांनी सांगितले.  या संकल्पनेअंतर्गत सुरुवातीला विवा महाविद्यालयात आणि त्यानंतर नालासोपारा येथील BVA भवन इथे तुमच्यासाठी 'ऑफिस' सुरू करण्यात येणार असल्याचेही ठाकूर म्हणाले.

 

तुमच्या कामाच्या वेळेत तुम्ही या ठिकाणी येऊन काम करू शकता. त्यासाठी तुम्हाला https://forms.gle/qkzbpmmiETEYnsdx5 या   लिंकवर  नोंदणी करायची आहे. ही सेवा नि:शुल्क असेल. या 'ऑफिस'मध्ये तुम्हाला खालील सेवा पुरवण्यात येतील.  १. इंटरनेट जोडणी  २. वीज   ३. टेबल आणि खुर्ची   ४. पिण्याच्या पाण्याची सोय   ५. गरज पडल्यास कम्प्युटर  तसंच बहुजन विकास आघाडीला तुमचीही काळजी आहेच. त्यामुळे इथे काम करताना कोरोनाबद्दलच्या सगळ्या नियमांचं पालन करण्यात येणार आहे. त्यासाठी खालील काळजी घेतली जाईल.  १. तापमानाची मोजणी     २. ऑक्सिजनची पातळी मोजणी    ३. मास्क वापरणं अनिवार्य   ४. ठिकठिकाणी सॅनिटायझर्सची सोय    ५. सोशल डिस्टन्सिंगचं पालन    घराचं ऑफिस बनवल्यामुळे हरवलेलं घराचं घरपण परत मिळवा आणि तुमच्या कुटुंबाबरोबरचा वेळ फक्त त्यांच्यासोबतच घालवावा अशी भावना या योजनेमागे असल्याचे संयोजकांनी सांगितले. 

  

 
 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA