दापोली येथे लाइफस्टाइल प्लॉट्स खरेदीची संधी
झानाडू रिअॅलिटीचा प्रकल्प; २५०० चौरस फुटांचे प्लॉट्स ९.९० लाखांत उपलब्ध
मुंबई
झानाडू रिअॅलिटी या अग्रगण्य रिअॅलिटी प्लॅटफॉर्मने ब्लिस (ब्रँड लँड इन्व्हेस्टमेंट स्टॉक्स स्कीम) हा प्रकल्प सादर केला असून याअंतर्गत ग्राहकांना भारताच्या एकमेव किनारपट्टीवरील हिल स्टेशन असलेल्या दापोली येथे नयनरम्य रहिवासी समुदायात लाइफस्टाइल प्लॉट्स खरेदी करुणायची सुवर्णसंधी मिळणार आहे. २५०० चौरस फुटांचे प्लॉट्स ९.९० लाख रुपये किंमतीला असून ग्राहक पहिल्या रकमेवर सहजपणे प्री-बुक करू शकतात. पुणे आणि मुंबईवरून फक्त ५ तासांच्या अंतरावर असलेले दापोली हे कोकण किनारपट्टीवर वसलेले आहे. कोकण किना-यावरील अलिबागनंतरचे हे मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल, असा अंदाज आहे. या प्रकल्पाच्या सुविधांमध्ये समुद्राच्या बाजूला क्युरेटेड लँड पार्सल, प्लॉट सहजपणे अधिग्रहित करण्यासाठी जमीन प्री-कट व पॅकेजिंग, वीज, रस्ते, पाणी या सर्व खात्रीशीर पायाभूत सुविधा, जागतिक पातळीवरील सुविधांसह संकल्पना आधारीत विकास, मालकीच्या कागदपत्रांत वैयक्तिक सात/बारा, एनकम्ब्रन्स सर्टिफिकेट आदींचा समावेश आहे.
झानाडू रिअॅलिटीचे संचालक सॅम्युज्वल घोष म्हणाले, “भारतात ग्राहकांदरम्यान जमीन खरेदीचे लोकशाहीकरण करणे, हा आमचा उद्देश आहे. जमीन मालकीतील सर्व अडथळे दूर करत भारतातील सर्वात सुरक्षित मालमत्ता आणण्याचे आम्ही ठरवले आणि हे ब्लिस या कोडनेमद्वारे या योजनेची सुरुवात केली. योजनेअंतर्गत, या पातळीवरील विकासात गुंतवणूक करण्याची दुर्मिळ संधी दिली जात आहे.”
------------------------------
‘ग्रो’ची सीरीज सी फेरीत ३० दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी
~ भारतात लाखो लोकांना गुंतवणूकीत सहज प्रवेश मिळवून देण्याचे ग्रोचे उद्दिष्ट ~
मुंबई
ग्रो या लोकप्रिय गुंतवणूक प्लॅटफॉर्मने वायसी कंटीन्युटीच्या नेतृत्वात सी सिरीजमध्ये ३० दशलक्ष डॉलर (२२० कोटी)ची निधी उभारणी केली आहे. प्रोपेल व्हेंचर्स या आधीच्याच गुंतवणूकदारांनीही यात सहभाग नोंदवला. वायसी कंटीन्युटीची ही भारतातील पहिलीच गुंतवणूक आहे. ‘ग्रो’ च्या तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी, उत्पादनाचा विस्तार करण्यासाठी तसेच अभियांत्रिकी, उत्पादन तसेच वृद्धीच्या क्षेत्रात प्रतिभावंत घेण्यासाठी हे भांडवल वापरले जाईल. या निधीचा काही भाग, भारतातील वित्तीय शिक्षणविषयक उपक्रम ‘अब इंडिया करेगा इन्व्हेस्ट’यासाठी वापरला जाईल.
‘ग्रो’ चे सह संस्थापक व सीईओ ललित केशरे म्हणाले, “ मागील काही वर्षांत आम्ही म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. भारतातील लाखो गुंतवणूकादारांसाठी हा साधा व पारदर्शी मार्ग आहे. गुंतवणुकदारांना त्यांच्या संपत्तीचे नियोजन करण्याचा चांगला अनुभव प्रदान करणे, हे आमचे ध्येय आहे. आमच्या दीर्घकालीन उद्दिष्टावर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणुकदारांशी भागीदारी करण्यात आम्हाला आनंद आहे. वायसीेने आमच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आताची गुंतवणूक ही आमच्या उद्दिष्टांप्रती मार्गक्रमण करण्यास गती देईल.”२०१७ मध्ये सुरुवात झालेल्या ग्रो हा भारतातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारा गुंतवणूक मंच आहे. यावर ८० लाख नोंदणीकृत युझर्स आहेत. मंचावर सध्या स्टॉक ब्रोकिंग आणि डायरेक्ट म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत. दोन्ही उत्पादनांनी अपवाद सोडले तर चांगली वृद्धी घेतली आहे. ग्रो दर महिन्याला १.५ लाखांपेक्षा एसआयपीची नोंद केली आहे. लाँचिंगनंतर तीन महिन्यात मासिक तत्त्वावर १ लाखाहून अधिक डिमॅट खाती जोडली गेल्याने ग्रो स्टॉक्समध्येही प्रचंड वाढ झाली.
0 टिप्पण्या