Top Post Ad

आर.टी.ई. प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या बालकांचे १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करावा  

आर.टी.ई. प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या बालकांचे १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करावा  


ठाणे
आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२०२१ करिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे त्यांनी दिनांक १५ सप्टेंबर २०२० पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा. असे आवाहन शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) शेषराव बडे यांनी केले आहे.  लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशाचा दिनांक मेसेज (SMS ) द्वारे कळविला जाईल. परंतु पालकांनी फक्त मेसेज (SMS) वर अवलंबून राहू नये. आर.टी.ई.पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा. शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये.  निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉक डाऊन मुळे/बाहेरगावी असल्याने /किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणेशक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि WHATS APP /EMAIL/किंवा अन्य माध्यमे यांचे द्वारा बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा शाळेतील तातपुरता प्रवेश निश्चित करावा. 


वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इ 1 ली ते 8वी पर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी शासनाने या घटकातील बालकांसाठी इ.1लीच्या मंजूर जागांच्या 25% प्रवेश हे त्या त्या शाळांच्या प्रथम प्रवेशस्तरावर (Entry level point वर) करावयाचे आहेत. ठाणे जिल्हयातील पाच तालुके व सहा मनपातील आर.टी.ई. 25% प्रवेशासाठी  दिनांक 31/03/2020 रोजी लॉटरीद्वारा निवड  प्रक्रीया पुर्ण करण्यात  आली असुन ९३२६ अर्जांची निवड झाली आहे. शाळांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
a)प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
b)आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे. 
महत्वाचे :- प्रतीक्षा यादी (Waiting List ) मधील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता सध्या शाळेत जाऊ नये .त्यांच्या करिता स्वतंत्र सूचना आर.टी.ई.पोर्टलवर नंतर दिल्या जातील .


ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी सुभाष भिवाजी भोर यांची नियुक्ती 


 ठाणे 
ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी सुभाष भिवाजी भोर यांची नियुक्ती झाली आहे. तत्पूर्वी ते उपसंचालक ( प्रशासन ) या पदी राज्य मुख्य कोषागार कार्यालय, मुंबई येथे कार्यरत होते. १९९१ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन ते शासकीय सेवेत रुजू झाले. यापूर्वी विविध शासकीय कार्यालयामध्ये तब्बल तीस वर्ष त्यांनी सेवा बजावली आहे. प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असणारे श्री. भोर मूळचे धामणगाव ता. अकोला जि.अहमदनगरचे रहिवासी आहेत. 



 



 


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com