Top Post Ad

खरीप हंगामात भात व नाचणी या पिकांसाठी प्रधानमंत्री पिकविमा योजना लागू

खरीप हंगामात भात व नाचणी या पिकांसाठी प्रधानमंत्री पिकविमा योजना लागू


 ठाणे
ठाणे जिल्ह्यात या वर्षी खरीप हंगामात भात व नाचणी या पिकांसाठी प्रधानमंत्री पिकविमा योजना लागू करण्यात आली आहे. या वर्षापासून ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. सन २०१९-२० मध्ये कर्जदार -१४३८९ व बिगर कर्जदार - ९४८ असे एकूण १५३३७ शेतक-यांनी भाग नोंदविला होता ,त्यापैकी १३७९० शेतक-यांना रु. ९.३२ कोटी रक्कम पीक संरक्षित रक्कम म्हणून मिळाली आहे,त्यामुळे मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना हातभार मिळाला होता.


या वर्षी भात व नाचणी पिकासाठी कर्जदार शेतकरी ३२९९६ व बिगर कर्जदारशेतकरी - २५१३ असे एकूण-३५५०९ शेतक-यांनी भाग नोंदविला इतक्या मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यात प्रथमतःच इतक्या शेतक-यांनी सहभाग नोंदविला असून हे एक प्रकारचे रेकॉर्डच आहे.मात्र ह्या योजनेत मिळालेला प्रतिसाद पाहता मा.श्री.राजेश नार्वेकर,जिल्हाधिकारी, ठाणे यांनी वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन करून फार मोठा हातभार लावला आहे.


कोविड -१९ च्या परिस्थितीत वेळोवेळी येणा-या सर्व अडचणी सोडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. जसे की,आपले सरकार सेवा केंद्र सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवणे तसेच आपले सरकार सेवाकेंद्रातील कर्मचाऱ्यांना ई-पास उपलब्ध करून देणे आणि शेतक-यांचा सहभाग वाढविण्यासाठी इफको टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लि.या पिकविमा कंपनीच्या माध्यमातून प्रचार व प्रसिद्धी साठी ग्रामीण स्तरावर २ कृषीरथ पाठवण्यात येऊन मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करून शेतक-यांचा मोठा सहभाग मिळविला तसेच वेळोवेळी बँकेच्या सभा घेऊन बँकेला येणा-या अडचणी सोडविण्यात आल्या आहेत.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1