अभिनेत्री कंगना रनौतला होमक्वारंटाईन केले जाणार - महापौर
मुंबई
अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावरुन कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंगना रनौतला Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर कंगना रनौतने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जाहीर आभार मानले आहेत. मुंबई आणि मुंबई पोलिसांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेसह महाराष्ट्रातील अनेक पक्षांनी कंगनावर टीकेची झोड उठवली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तर कंगनाला मुंबईत आल्यानंतर धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. आमदार प्रताप सरनाईक यांनीही कंगना इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही, असे जाहीर केले. त्यानंतर वातावरण चांगलंच तणावपूर्ण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा दिली आहे.
“मी 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा” अशा शब्दात अभिनेत्री कंगना रनौत हिने ट्विटरवरुन आव्हान दिले होते. ती ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. मात्र ती मुंबईत येताच तिला नियमानुसार होम क्वारंटाईन केलं जाईल,” अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. “परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केलं जातं. त्यानुसार कंगनालाही होम क्वारंटाईन केलं जाईल, नियमानुसार कंगनाच्या हातावरही विमानतळावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार आहे.” ” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
ICMR च्या मार्गदर्शक प्रणालीनुसार, परराज्याततून आलेल्या व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्याचे नियम आहेत. मी प्रशासनाकडून माहिती घेतली. आज किंवा उद्यामध्ये काही नवे नियम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार महापालिका प्रशासन कार्यवाही करेल, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.
सुशांत राजपूतचा तपास इतका महत्वाचा आहे, की या तपासासाठी एफबीआय वापरत असलेले डिव्हाइस विकत घेण्याचे प्रस्तावित आहे. तसेच अभिनेत्री कंगना राणावत हिला केंद्र सरकारने वाय सिक्युरिटी दिलेली आहे ! परंतु हिच तत्परता विदर्भातील स्वपक्षीय भाजपचे बहुजन नेतृत्व दिवंगत स्व. मा. गोपीनाथजी मुंढे यांच्या अपघाती मृत्यूचे तपासात आवश्यक भासली नाही ? मात्र तसेच डाॅ. नरेंद्र दाभोलकर, काॅ. पानसरे, मा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश, महिला सहायक पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे, वगैरे महत्वाच्या व्यक्तींच्या हत्येच्या तपासात सुद्धा गरज भासत नाही ? एवढा सुशांतसिंग राजपूत मृत्यू तपास महत्वाचा का झालेला आहे ! काय गूढ आहे या तपासामागे ?
- वंदना गावडे (सांताक्रूझ, मुंबई)
0 टिप्पण्या