कबीर कला मंचचे शाहीर सागर गोरखे आणि शाहीर रमेश गायचोर यांना  केली NIA ने अटक

कबीर कला मंचचे शाहीर सागर गोरखे आणि शाहीर रमेश गायचोर यांना  केली NIA ने अटक


मुंबई


भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानाचे सदस्य आणि कबीर कला मंचचे शाहीर सागर गोरखे आणि शाहीर रमेश गायचोर यांना आज मोदी सरकारच्या NIA ने अटक केली आहे. NIA कडून शाहीर रमेश गायचोर आणि शाहीर सागर गोरखे यांना अनेक दिवस चौकशीसाठी बोलावले गेले. चौकशीचा फार्स दाखवून त्या दोघांना माफीचे साक्षीदार बना नाहीतर तुम्हांला अटक करतो अशा पद्धतीच्या धमक्या देण्यात येत होत्या. या दोघाही शाहिरांना हे धमकवण्यात आलं की, 'तुम्ही हे CRPC कायदा 164 कलमा अंतर्गत माफीचे साक्षीदार बना आणि त्यात हे मान्य करा की तुम्ही गडचिरोलीच्या जंगलात जाऊन नक्षलवाद्यांना भेटून आलात आणि तुमचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत. जर तुम्ही हे मान्य केलं नाही तर आम्ही तुम्हाला अटक करू.' 


अशा ही परिस्थितीत दोन्हीही शाहिरांनी या व्यवस्थेसमोर झुकण्यास साफ नकार दिला आणि NIA च्या या खोट्या षडयंत्राला दोघांनीही उधळून लावले. भिमा-कोरेगाव -एल्गार परिषद प्रकरणी आतापर्यंत देशभरातील मानवाधिकार कार्यकर्ते, वकील, प्राध्यापक आणि साहित्यिकांच्या अटका झाल्या आहेत. यामध्ये आता ज्यांनी जनतेची दुःख, वेदना, संघर्षात समरस होऊन या ब्राम्हणी व्यवस्थेला संविधानिक मार्गाने विरोध केला अशा आंबेडकरी कार्यकर्त्यांचा आवाज दडपण्याचं काम ह्या कपटी सरकारने केलं आहे. आणि हे स्पष्ट झाले आहे की एल्गार भीमा कोरेगाव खटल्यात ना पुणे पोलिसांकडे काही ठोस पुरावे होते आणि ना NIA कडे कोणतेही पुरावे आहेत. आणि म्हणूनच आता सामाजिक कार्यकर्त्यांवर अशाप्रकारे दबावतंत्र लादले जात आहे.  भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानातर्फे शाहीर सागर गोरखे आणि शाहीर रमेश गायचोर यांच्या अटकांचा धिक्कार आणि त्यांच्या सुटकेसाठी एकत्रितपणे आवाज बुलंद करण्याचे आवाहन कबीर कला मंचच्या वतीने करण्यात आले आहे.


सागर व रमेश यांचा अटकेपूर्वीचे व्हिडिओ आवाहन 
https://www.facebook.com/302510613486877/posts/856669171404349/


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या