माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची गती वाढवा: काम न करणा-यांवर होणार कारवाई
ठाणे
राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ या मोहिमेची गती वाढविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले. दरम्यान जे शिक्षक किंवा इतर कर्मचारी काम करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी सर्व उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची २३ सप्टेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या बैठकीत ते बोलत होते.
कोरोना विरूद्धच्या लढाईमध्ये महत्वाची मोहिम म्हणून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. ठाणे शहरामध्ये ही मोहिम अतिशय व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असून याची गती वाढविण्याची गरज असून सर्व सहाय्यक आयुक्त आणि वैद्यकिय अधिकारी यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्त डाॅ. शर्मा यांनी या बैठकीत दिल्या. तसेच जे शिक्षक किंवा जे कर्मचारी या मोहिमेत काम करीत नाहीत किंवा काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्त यांनी दिल्या
0 टिप्पण्या